Home / चंदेरी च्युइंगम / Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ; खलिस्तान समर्थक आक्रमक

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ; खलिस्तान समर्थक आक्रमक

Diljit Dosanjh : कॅनडातील व्हँकुव्हर शहरात पंजाबी गायक Diljit Dosanjh यांच्या कॉन्सर्टदरम्यान खलिस्तान समर्थकांनी गोंधळ (Chaos) घातल्याची घटना समोर आली...

By: Team Navakal
Diljit Dosanjh
Social + WhatsApp CTA

Diljit Dosanjh : कॅनडातील व्हँकुव्हर शहरात पंजाबी गायक Diljit Dosanjh यांच्या कॉन्सर्टदरम्यान खलिस्तान समर्थकांनी गोंधळ (Chaos) घातल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमस्थळी भारतविरोधी घोषणा (Anti-India Slogans) देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दोसांझ यांच्या कॅनडा दौऱ्यादरम्यान काही जणांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करून घोषणाबाजी केली. काही समर्थकांनी खलिस्तानचे झेंडे फडकवले. सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पन्नूची धमकी

बंदी घातलेल्या Sikhs for Justice या संघटनेचा नेता Gurpatwant Singh Pannun यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत दोसांझ यांच्यावर आरोप (Allegation) केले. त्यांनी दोसांझ हे भारत सरकारच्या विचारसरणीचा प्रचार (Propaganda) करत असल्याचा दावा केला.

पन्नूने इशारा (Threat) देत सांगितले की, खलिस्तान समर्थक दोसांझ यांच्या पुढील कार्यक्रमांमध्येही गोंधळ घालतील. कॅलगरी, एडमंटन, विनिपेग, टोरोंटो तसेच अमेरिकेतील काही शहरांमध्येही विरोध (Protest) केला जाईल, असे त्याने म्हटले आहे.

सुरक्षेची चिंता वाढली

या घटनेनंतर दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही त्यांच्या काही परदेशातील कार्यक्रमांपूर्वी अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या.

कोण आहेत दिलजीत दोसांझ?

बॉलिवूड चित्रपटांमधून Diljit Dosanjh यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असली तरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूडमधून नव्हे, तर पंजाबी सिनेसृष्टीतून झाली. त्यामुळेच त्यांना ‘किंग ऑफ पंजाबी फिल्म्स’ (King of Punjabi Films) असेही म्हटले जाते.

पंजाबमधील एका छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात (Farmer Family) जन्मलेल्या दिलजीत सिंह यांचा दिलजीत दोसांझपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे (Financial Issues) त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर ते लग्नसमारंभ आणि मंदिरांमध्ये गाणी गाऊन पैसे कमवत होते.

२००४ मध्ये त्यांना पहिल्यांदा पंजाबी अल्बममध्ये गाण्याची संधी मिळाली. ‘इश्क दा उडा अडा’ (Ishq Da Uda Ada) हा त्यांचा पहिला अल्बम ठरला. या अल्बमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद (मिळाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

यानंतर ‘द लायन ऑफ पंजाब’ (The Lion of Punjab) या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात (Acting Career) पदार्पण केले. पुढे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘गूडन्यूज’ (Good Newwz) या बॉलिवूड चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचेही मोठे कौतुक झाले.

आज पंजाबी सिनेसृष्टीतील (Punjabi Industry) मोठा स्टार असलेल्या दिलजीत दोसांझ यांची संपत्तीही मोठी आहे. महागडे आणि परदेशी ब्रॅन्डचे कपडेपरिधान करण्याची त्यांना आवड असून, याबाबत त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.


हे देखील वाचा –

 लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा; ११ कोटींची वसुली सुरू

केईएम रुग्णालय नामांतरावरून वाद; नाव बदलापेक्षा सुविधा द्या -मार्डची मागणी

‘आप’ सोडली तरी खासदारकी का जाणार नाही? जाणून घ्या राघव चड्ढा आणि 6 खासदारांच्या ‘सेफ गेम’मागचे गणित

कोकणचा राजा रडतोय! हापूसच्या उत्पादनात 80 टक्क्यांची घट; यंदा देवगडच्या बागांमधून आंब्यांचा सुगंधच गायब

Web Title:
संबंधित बातम्या