Home / देश-विदेश / Sheetal Vrazien Murder : अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची पतीकडून हत्या, मुलगा जखमी

Sheetal Vrazien Murder : अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची पतीकडून हत्या, मुलगा जखमी

Sheetal Vrazien Murder : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात घरगुती वादातून भारतीय वंशाच्या तंत्रज्ञ आणि गुगलमधील वरिष्ठ अभियंता शीतल व्रेझियन यांची निर्घृण...

By: Team Navakal
Sheetal Vrazien Murder
Social + WhatsApp CTA

Sheetal Vrazien Murder : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात घरगुती वादातून भारतीय वंशाच्या तंत्रज्ञ आणि गुगलमधील वरिष्ठ अभियंता शीतल व्रेझियन यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्या पती ५६ वर्षीय कर्क बी. व्रेझियन यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कॉब काउंटीमधील लॉरेल क्रीक ट्रेल परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. या गोळीबारात शीतल व्रेझियन यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा २३ वर्षीय मुलगा जेसन व्रेझियन जखमी झाला.

गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत जेसन कसाबसा घराबाहेर पडला आणि शेजाऱ्यांकडे मदत मागितली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शीतल व्रेझियन यांना मृतावस्थेत आढळून आले, तर कर्क व्रेझियन यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले असून, इतर कोणालाही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कर्क व्रेझियन यांच्यावर खून, गंभीर हल्ला आणि गुन्हा करताना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना कॉब काउंटीच्या प्रौढ कारागृहात ठेवण्यात आले असून, हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

दरम्यान, एका शेजाऱ्याने सांगितले की, जेसन जखमी अवस्थेत घराबाहेर धावत आला आणि मदतीसाठी दार ठोठावत होता. एका घराचे दार बंद असल्याने तो पुढील घरात गेला. तेथील रहिवाशांनी त्याला आत घेत प्रथमोपचार केले आणि रुग्णवाहिका येईपर्यंत रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला.

शीतल व्रेझियन कोण होत्या?

शीतल व्रेझियन या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थिनी असून गुगलमध्ये अभियांत्रिकी प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना दोन दशकांहून अधिक अनुभव होता. गुगलमध्ये येण्यापूर्वी त्यांनी ‘होम डेपो’च्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी मोबाइल आणि डिजिटल परिवर्तन उपक्रमाचे नेतृत्व केले होते.

त्यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांनी अमेरिका, इंग्लंड, भारत आणि घाना या देशांत कामाचा अनुभव घेतला होता. १९९४ साली त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती. त्यांच्या निधनाने तंत्रज्ञान क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या