Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली दिली. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे क्रूर मनसुबे कधीही यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी शत्रू राष्ट्राला इशारा दिला आहे.
Pahalgam Terror Attack: काय घडले होते वर्षभरापूर्वी?
गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात देशभरातील पर्यटकांसह एकूण 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता.
या कटू आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदींनी ‘X’ वर पोस्ट केली की, “गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या अमानुष हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांची आज आठवण येत आहे. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही.”
Remembering the innocent lives lost in the gruesome Pahalgam terror attack on this day last year. They will never be forgotten. My thoughts are also with the bereaved families as they cope with this loss.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026
As a nation, we stand united in grief and resolve. India will never bow to…
Pahalgam Terror Attack: पीडित कुटुंबांच्या पाठीशी देश खंबीर
पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण या दु:खात आणि संकल्पात एक आहोत. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
Pahalgam Terror Attack: भारताचे प्रत्युत्तर: ‘ऑपरेशन सिंदूर’
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोठी लष्करी मोहीम राबवली होती. या धाडसी कारवाईत भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताने आपल्या सामर्थ्याचा परिचय देत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले होते.
हे देखील वाचा –
Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला










