Prashant Kishor Net Worth: बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ‘जन सुराज’चे संस्थापक आणि प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर स्वतः उमेदवार म्हणून उतरले आहेत. त्यांनी 13 जुलै रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रातून त्यांची आणि त्यांची पत्नी जान्हवी दास यांच्या मालमत्तेची सविस्तर माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रातील आकड्यांनुसार, प्रशांत किशोर यांच्या तुलनेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चल संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत किशोर आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती; पाहा कोणाकडे काय आहे?
दोघांच्याही बँक खात्यातील रक्कम, दागिने आणि गुंतवणुकीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- चल संपत्ती: प्रशांत किशोर यांच्याकडे 22 कोटी 19 लाख 74 हजार 976 रुपये मूल्याची चल संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नी जान्हवी दास यांच्याकडे तब्बल 99 कोटी 51 लाख 67 हजार 249 रुपयांची चल संपत्ती आहे.
- अचल संपत्ती आणि जमीन: प्रशांत किशोर यांच्या नावावर 73 कोटी 87 लाख रुपयांची जमीन आणि इतर प्रॉपर्टी आहे, तर अचल संपत्ती 23 कोटी 70 लाख 80 हजार 256 रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर 12 कोटी 42 लाख रुपयांची जमीन आणि 1 कोटी 19 हजार 270 रुपयांची अचल संपत्ती आहे.
- वार्षिक उत्पन्न: आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रशांत किशोर यांचे उत्पन्न 58 लाख 45 हजार 430 रुपये होते, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 40 लाख 23 हजार 800 रुपये नोंदवले गेले आहे.
- बँक ठेवी आणि कर्ज: प्रशांत किशोर यांच्या नावावर 7 कोटी 36 लाख 24 हजार 202 रुपयांच्या फिक्स डिपॉझिट आहेत, तर त्यांच्यावर 5 कोटी 77 लाख 53 हजार 765 रुपयांचे कर्ज देखील आहे.
दागिने, घरे आणि पक्षाला दिलेले दान
प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या इतर मालमत्तेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- एकही स्वतःची गाडी नाही: कोट्यवधींची संपत्ती असूनही प्रशांत किशोर यांच्या नावावर एकही स्वतःची वैयक्तिक गाडी नाही.
- दागिने: प्रशांत किशोर यांच्याकडे 1 लाख 35 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आहे. त्यांच्या पत्नीकडे 64 लाख 12 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 46 हजार रुपयांची चांदी आहे.
- घरे आणि इमारती: त्यांच्याकडे एकूण 7 वेगवेगळ्या ठिकाणी घरे अथवा इमारती आहेत.
- पक्षाला दिलेली देणगी: प्रशांत किशोर यांनी आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान स्वतःच्या ‘जन सुराज पार्टी’ला 10 कोटी रुपयांचे दान दिले आहे.
- शैक्षणिक पात्रता आणि दाखल गुन्हे : प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर त्यांनी 1991 मध्ये 10 वी आणि 1993 मध्ये पाटणा सायन्स कॉलेजमधून 12 वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1996 ते 1999 या काळात त्यांनी लखनऊ विद्यापीठातून पदवी मिळवली. पुढे उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले आणि 2010 मध्ये त्यांनी फ्रान्समधील विद्यापीठातून आपली उच्च पदवी संपादन केली.











