Home / देश-विदेश / Shashi Tharoor on BJP Victory : केरळमध्ये काँग्रेस तर बंगालमध्ये भाजपचा विजय कशामुळे झाला? शशी थरूर यांनी सांगितले कारण

Shashi Tharoor on BJP Victory : केरळमध्ये काँग्रेस तर बंगालमध्ये भाजपचा विजय कशामुळे झाला? शशी थरूर यांनी सांगितले कारण

Shashi Tharoor on BJP Victory : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पश्चिम बंगाल आणि केरळमधील निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना मतदार...

By: Team Navakal
Shashi Tharoor on BJP Victory
Social + WhatsApp CTA

Shashi Tharoor on BJP Victory : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पश्चिम बंगाल आणि केरळमधील निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना मतदार यादीतील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर मोठे विधान केले आहे. स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये बोलताना थरूर यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने मतदारांची नावे वगळण्यात आली, त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला असू शकतो.

बंगालमधील निकालावर शंका

थरूर यांनी नमूद केले की, पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून तब्बल 91 लाख नावे काढून टाकण्यात आली होती. त्यापैकी 34 लाख लोकांनी आपण जिवंत आणि पात्र मतदार असल्याचे सांगत अपील केले होते. नियमानुसार प्रत्येक अपिलावर स्वतंत्र सुनावणी होणे आवश्यक होते, मात्र मतदानापूर्वी केवळ काही शंभर प्रकरणांचाच निकाल लागला.

थरूर यांच्या मते, आजही 31 ते 32 लाख लोकांचे अपील प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय 30 लाख मतांच्या फरकाने झाला आहे. हा फरक आणि प्रलंबित अपिलांची संख्या जवळपास सारखीच असल्याने, पात्र मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून ही प्रक्रिया कितपत लोकशाहीपूर्ण आहे, असा सवाल केला आहे.

केरळमध्ये काँग्रेसला फायदा?

केरळच्या बाबतीत बोलताना थरूर यांनी मान्य केले की, तिथे मतदार यादीतील शुद्धीकरण प्रक्रियेचा फायदा काँग्रेसला झाला असावा. केरळमध्ये यापूर्वी एकाच व्यक्तीची नावे दोन, तीन किंवा चार वेगवेगळ्या बूथवर असायची. या ‘डबल एनरोलमेंट’ मास्टर माइंड म्हणून त्यांनी डाव्या पक्षांवर (CPM) निशाणा साधला. मात्र, केरळ आणि तामिळनाडूमध्ये बंगालच्या तुलनेत अपिलांची संख्या अत्यंत कमी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2026 मधील निवडणूक निकाल

  • पश्चिम बंगाल: 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आणि तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तिथे पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले.
  • केरळ: केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) ने 140 पैकी 102 जागा जिंकून डाव्यांची 10 वर्षांची सत्ता संपवली. भाजपनेही तिथे आपल्या जागा 3 पर्यंत वाढवल्या आहेत.

मतदार यादीतील ही ‘साफसफाई’ तांत्रिक होती की राजकीय प्रेरित, यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा – PM Modi Appeal: इंधनाची बचत करा आणि वर्षभर सोनं खरेदी टाळा! पंतप्रधान मोदींचे देशाला मोठे आवाहन; पाहा नक्की असे का म्हणाले?

Web Title:
संबंधित बातम्या