Home / देश-विदेश / West Bengal Exit Poll 2026: 15 वर्षांची सत्ता धोक्यात! भाजपला 192 जागा मिळण्याचा अंदाज, बंगालमध्ये परिवर्तनाची लाट?

West Bengal Exit Poll 2026: 15 वर्षांची सत्ता धोक्यात! भाजपला 192 जागा मिळण्याचा अंदाज, बंगालमध्ये परिवर्तनाची लाट?

West Bengal Exit Poll 2026: पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात यावेळी मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. जाहीर झालेल्या ‘टुडेज चाणक्य’च्या...

By: Team Navakal
West Bengal Exit Poll 2026
Social + WhatsApp CTA

West Bengal Exit Poll 2026: पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात यावेळी मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. जाहीर झालेल्या ‘टुडेज चाणक्य’च्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

या अंदाजानुसार, बंगालमध्ये भाजपला १९२ हून अधिक जागांसह स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. जर हे आकडे प्रत्यक्ष निकालात बदलले, तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येऊ शकते.

भाजप बहुमताच्या पार, टीएमसी पिछाडीवर

बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण जागांपैकी बहुमतासाठी १४७ आकड्यांची गरज आहे. ‘टुडेज चाणक्य’ने भाजपला १९२+ जागांचा कौल दिला आहे, तर टीएमसीला केवळ १००+ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. इतर पक्षांना फक्त २ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला झुकते माप देणारा हा पाचवा एक्झिट पोल ठरला असून, मतदारांचा कल मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे हे संकेत आहेत.

इतर संस्थांचे एक्झिट पोल काय सांगतात?

केवळ चाणक्यच नव्हे, तर इतर अनेक संस्थांनीही भाजपला आघाडी दिली आहे:

  • P-Marq: भाजप १५०-१७५ जागा, टीएमसी ११८-१३८ जागा.
  • Matrize: भाजप १४६-१६१ जागा, टीएमसी १२५-१४० जागा.
  • Chanakya Strategies: भाजप १५०-१६० जागा, टीएमसी १३०-१४० जागा.
  • Poll Diary: भाजप १४२-१७१ जागा, टीएमसी ९९-१२७ जागा.

मात्र, ‘पीपल्स पल्स’ आणि ‘जनमत पोल्स’ यांनी अद्यापही ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व कायम राहील आणि त्यांना १८० ते २०० जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. ‘JVC’ ने मात्र दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर होईल असे म्हटले आहे.

२०२१ ची पुनरावृत्ती होणार का?

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही अनेक एक्झिट पोलनी चुरशीची लढत वर्तवली होती, पण प्रत्यक्ष निकालात टीएमसीने २१५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप ७७ जागांवर थांबला होता. यावेळी २३ आणि २९ एप्रिल रोजी झालेल्या दोन टप्प्यातील मतदानात ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. भाजपने या विक्रमी मतदानाला ‘परिवर्तना’ची लाट म्हटले आहे.

येत्या ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच बंगालचा ‘मुलगा’ कोण आणि ‘दीदी’ सत्तेत राहणार की नाही, याचे चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलचे अंदाज अनेकदा चुकू शकतात, त्यामुळे अंतिम निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Day 2026: 1 मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? वाचा सविस्तर इतिहास

Web Title:
संबंधित बातम्या