Home / अर्थ मित्र / कर चुकवू नका, आयकर विभागाकडून खास शोधमोहिम सुरू

कर चुकवू नका, आयकर विभागाकडून खास शोधमोहिम सुरू

आयकर वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करणाऱ्या करबुडव्यांसाठी आयकर विभागाने खास शोधमोहिम सुरू केली आहे. करदात्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी...

आयकर वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करणाऱ्या करबुडव्यांसाठी आयकर विभागाने खास शोधमोहिम सुरू केली आहे. करदात्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी इनसाइट पोर्टलचा वापर करत असून या पोर्टलद्वारे करबुडव्यांची नावे समोर येणार आहेत.

जोखीम मापदंडांच्या आधारे, हे पोर्टल कर चुकवणाऱ्यांची नावे काढून आयकर विभागाला पुरवते. बँका, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांकडून या पोर्टवर डेटा अपलोड करण्यात येतो. या डेटाच्या आधारे आयकर विभागाचे अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.

मार्चच्या अखेरपर्यंत अनेकजण कर भरतात. मात्र, अनेकजण कर चुकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी अधिक सक्रीय झाले आहेत. ज्यांनी टॅक्स भरला नाही किंवा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आयकर विभागाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच, इनसाईड पोर्टलद्वारे अशा कर चुकवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या