V-Mart Retail Ltd : देशभर पसरलेली फॅशन साखळी

एकाच छताखाली कपडे, चपला, दागिने आदी विविधे पर्याय उपलब्ध करून देणारी साखळी म्हणजे व्हि-मार्ट. व्हि-मार्टमध्ये कुटुंबातील प्रत्येकासाठी फॅशन पर्याय उपलब्ध आहेत. पश्चिम बंगालमध्ये २००२ साली वरीन कर्मशिअल प्रायव्हेट लिमिटेडटी स्थापना झाली होती. त्यानंतर ही कंपनी २००३ साली गुजरातच्या अहमदाबाद येथेही विस्तारित झाली. २००४ साली या कंपनीने दिल्ली येथे स्वतःचे मोठे फॅशन स्टोअर स्थापन केले. त्यानंतर २००६ साली वरीन कर्मशिअल प्रायव्हेट लिमिटेड १ लाख स्क्वेअर फूटमध्ये विस्तारीत झाले आणि कालांतराने या कंपनीचे नाव व्हि-मार्ट असे झाले. एवढेच नव्हे तर या कंपनीचे वेबपोर्टलही असून तुम्ही ऑनलाईन शॉपिंगही करू शकता.

व्हि-मार्टचे २६ राज्यातील २३५ शहरांमध्ये ३६८ स्टोअर्स आहेत. या कंपनीची खासियत म्हणजे केवळ मोठ्या शहरांतच या कंपनीचे स्टोअर्स नसून लहान लहान शहरांतही स्टोअर्स उपलब्ध आहेत. २००८ साली व्हि-मार्ट पब्लिक लिस्टेड कंपनी बनली. अवघ्या सहा वर्षांत या कंपनीने १ हजार मिलिअन रुपयांचा टप्पा पार केला.

या कंपनीने डिसेंबर २०२१ तिमाहित १९.३० टक्क्यांनी नफा कमावला आहे. त्यामुळे या तिमाहित कंपनीला ५७.११ कोटींचा मूळ नफा झाला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स कोसळत असून गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. मात्र, या कंपनीची एकूणच प्रगती पाहता कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा वधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Scroll to Top