Home / क्रीडा / BCCI Fined RCB coach : आरसीबीचा विजयाचा जल्लोष सुरू असतानाच बीसीसीआयचा झटका! हेड कोच अँडी फ्लॉवरवर मोठी कारवाई; आनंदावर पडलं विरजण!

BCCI Fined RCB coach : आरसीबीचा विजयाचा जल्लोष सुरू असतानाच बीसीसीआयचा झटका! हेड कोच अँडी फ्लॉवरवर मोठी कारवाई; आनंदावर पडलं विरजण!

BCCI Fined RCB coach : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी...

By: Team Navakal
BCCI Fined RCB coach
Social + WhatsApp CTA

BCCI Fined RCB coach : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यावर बीसीसीआयने कठोर कारवाई केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांशी वाद घालणे आणि अपशब्दांचा वापर करणे फ्लॉवर यांना महागात पडले असून, त्यांच्या मानधनातून १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वादाचे मूळ आणि घटनाक्रम-
हा वाद रायपूर येथे पार पडलेल्या सामन्यात आरसीबीच्या डावातील १७ व्या षटकात उद्भवला. आरसीबीचे फलंदाज धावांचा पाठलाग करत असताना कृणाल पांड्याने अल्लाह गजनफरच्या चेंडूवर लेग साइडला एक जोरदार फटका मारला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या नमन धीरने चेंडू अडवून तो मैदानाकडे भिरकावला. जवळच असलेल्या तिलक वर्माला तो चेंडू झेल स्वरूपात पकडता आला नाही. या प्रसंगाचा पुनरावलोकन (रिप्ले) केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी नमन धीरचा प्रयत्न नियमानुसार ग्राह्य धरत आरसीबीला धावा नाकारल्या.

पंचांच्या या निर्णयामुळे आरसीबीच्या गोटात तीव्र संतापाची लाट उसळली. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी डगआउटमधून थेट चौथ्या पंचांकडे धाव घेतली. यावेळी पंचांशी चर्चा करताना फ्लॉवर यांची संयम सुटला आणि त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर झाला. ही बाब आचारसंहितेच्या विरोधात असल्याने मॅच रेफरी अमित शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

आचारसंहितेचे उल्लंघन आणि शिक्षा-
बीसीसीआयने अँडी फ्लॉवर यांना आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ अंतर्गत दोषी ठरवले आहे. हा नियम मैदानावर अश्लील किंवा अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. हे ‘लेव्हल-१’ प्रकारातील उल्लंघन असून, सुनावणी दरम्यान फ्लॉवर यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्यांच्या सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाणार आहे.

अटीतटीच्या सामन्यात आरसीबीचा रोमांचक विजय-
मैदानावरील या वादाव्यतिरिक्त हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कृणाल पांड्याने ७३ धावांची झुंजार खेळी केली. शेवटच्या षटकात सामना कोणत्याही बाजूला झुकण्याची शक्यता असताना भुवनेश्वर कुमार आणि रसिख सलाम यांनी मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत आरसीबीला दोन गड्यांनी अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान अधिक भक्कम झाले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या