Home / क्रीडा / Neymar Injury Update: नेयमार वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही? वैद्यकीय चाचणीनंतर चिंता वाढली

Neymar Injury Update: नेयमार वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही? वैद्यकीय चाचणीनंतर चिंता वाढली

Neymar Injury Update: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा स्टार खेळाडू नेयमार याच्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. आगामी विश्वचषक सामन्यांपूर्वी...

By: Team Navakal
Neymar Injury Update: नेयमार वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही? वैद्यकीय चाचणीनंतर चिंता वाढली
Social + WhatsApp CTA

Neymar Injury Update: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा स्टार खेळाडू नेयमार याच्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. आगामी विश्वचषक सामन्यांपूर्वी नेयमारच्या उजव्या पायाची पुन्हा एकदा नवीन वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, त्याच्या मैदानावरील पुनरागमनाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

सुरुवातीला तो सरावासाठी मैदानात उतरेल अशी आशा होती, परंतु तो सहकाऱ्यांसोबत सराव सत्रात सामील होऊ शकला नाही. त्याऐवजी तो उजव्या पायाच्या पोटरीच्या चाचणीसाठी थेट क्लिनिकमध्ये गेला. ब्राझिलियन सॉकर फेडरेशनने या चाचणीचा अहवाल अजून जाहीर केलेला नाही. 34 वर्षांचा हा दिग्गज खेळाडू त्याच्या कारकिर्दीतील चौथा वर्ल्ड कप खेळण्यासाठी उत्सुक आहे, मात्र 17 मे पासून दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर आहे.

पहिल्या सामन्यातील सुमार कामगिरीमुळे नेयमारची गरज वाढली

ब्राझीलने या विश्वचषकाची सुरुवात मोरोक्कोविरुद्ध 1-1 अशा बरोबरीने केली. या सामन्यात ब्राझीलच्या आक्रमक फळीला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे संघात नेयमारसारख्या अनुभवी खेळाडूची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

ब्राझिलियन मीडियाच्या माहितीनुसार, वैद्यकीय पथक त्याला बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. नेयमार नॉकआउट सामन्यात मैदानात उतरलेला पाहिला मिळू शकतो. न्यू जर्सीमध्ये संघाचा सराव सुरू झाल्यापासून नेयमारने अद्याप एकाही पूर्ण सराव सत्रात भाग घेतलेला नाही. ब्राझीलचा पुढील सामना शुक्रवारी हैतीविरुद्ध फिलाडेल्फिया येथे होणार आहे.

नेयमारच्या निवडीवरून ब्राझीलमध्ये दोन गट

नवीन मुख्य प्रशिक्षक कार्लो अंसेलोटी यांनी नेयमारला संघात स्थान दिल्यामुळे ब्राझीलमध्ये सध्या जोरदार वाद सुरू आहेत:

  • अनुभवाचा फायदा: समर्थकांच्या मते, नेयमारचा दांडगा अनुभव संघाला कठीण परिस्थितीत विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • तरुणांवर अन्याय: समीक्षकांचे म्हणणे आहे की, नेयमारचा सुवर्णकाळ आता संपला असून त्याच्यामुळे एका तरुण आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूची संधी हुकली आहे.

दरम्यान, मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नसला तरी नेयमारने मैदानाबाहेर उपस्थित राहून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तिथे त्याने रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट आणि दिग्गज खेळाडू टॉम ब्रेडी यांची भेट घेतली.

इतर ३ खेळाडूंचा स्वतंत्र सराव; नेयमारच्या घरात आनंदाचे वातावरण

नेयमारशिवाय गॅब्रिएल मगालेश, ब्रुनो गुइमारेस आणि राफिन्या हे तीन खेळाडूही मुख्य संघासोबत सराव करू शकले नाहीत. तंदुरुस्ती सुधारण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे सराव केला.

दुसरीकडे, वैयक्तिक आयुष्यात नेयमारसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नेयमार आणि त्याची पार्टनर ब्रुना बियानकार्डी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ब्रुना ही गरोदर असून नेयमारच्या पोटी तिसऱ्यांदा कन्यारत्न येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग

Web Title:
संबंधित बातम्या