Vaibhav Sooryavanshi IPL Record: आयपीएल २०२६ मध्ये अवघ्या 15 वर्षांच्या एका तरुण खेळाडूने आपल्या फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात 29 चेंडूंत 97 धावांची धुव्वाधार खेळी केली. या स्फोटक खेळीच्या जोरावर त्याने राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर 2 मध्ये पोहोचवले असून कित्येक वर्षांचे जुने ऐतिहासिक विक्रम मोडीत काढले आहेत.
वैभवच्या या वादळी कामगिरीनंतर स्वतः ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे. गेलने वैभवला क्रिकेट जगतातील ‘नवी सिक्स मशीन’ म्हणून संबोधले आहे.
Vaibhav Sooryavanshi IPL Record: ख्रिस गेलचा १४ वर्षे जुना विक्रम मोडला
या मोसमात वैभवने षटकारांचा पाऊस पाडत टी20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आयपीएल २०१२ मधील ख्रिस गेलचा विक्रम मोडला:
- सर्वाधिक षटकार: वैभवने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण 65 षटकार ठोकले आहेत. ख्रिस गेलने २०१२ च्या हंगामात 59 षटकार मारले होते.
- कमी चेंडूंचा वापर: गेलने 59 षटकारांसाठी 456 चेंडू खेळले होते, तर वैभवने केवळ 266 चेंडूंचा सामना करत 65 षटकार खेचले आहेत.
- वेगवान १० षटकार: या सामन्यात वैभवने पहिले 10 षटकार केवळ 24 चेंडूंत मारले. गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 27 चेंडूंत 10 षटकार मारले होते.
Vaibhav Sooryavanshi IPL Record: सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी
हैदराबादविरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल प्लेऑफ किंवा बाद फेरीच्या इतिहासातील हे संयुक्तपणे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध क्वालिफायर २ सामन्यात सुरेश रैनाने १६ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते.
Vaibhav Sooryavanshi IPL Record: स्ट्राइक रेटचा नवा जागतिक रेकॉर्ड
वैभव सूर्यवंशीने या हंगामात 15 डावांमध्ये 680 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच स्पर्धेत 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 600 हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 242.85 इतका राहिला आहे.
तसेच ९७ धावांच्या या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 334.48 होता. आयपीएलमधील ९० पेक्षा जास्त धावांच्या खेळीत कोणत्याही फलंदाजाचा हा सर्वोच्च स्ट्राइक रेट आहे. या बाबतीत त्याने रजत पाटीदारचा (334.48 विरुद्ध 281.81) रेकॉर्ड मोडला.
Vaibhav Sooryavanshi IPL Record: पॉवरप्ले आणि बाद फेरीतील इतर विक्रम
गेलच्या विक्रमाशी बरोबरी: आयपीएलच्या एकाच डावात १० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याची कामगिरी वैभवने कारकिर्दीत ४ वेळा केली आहे. ख्रिस गेलनेही अशी कामगिरी ४ वेळा केली होती.
पॉवरप्लेमधील धावा: वैभवने या हंगामात पहिल्या ६ ओव्हर्समध्ये म्हणजेच पॉवरप्लेमध्ये तब्बल 490 धावा कुटल्या आहेत. त्याने डेव्हिड वॉर्नरचा २०१६ मधील 467 धावांचा विक्रम मोडीत काढला.
एकाच डावात १२ षटकार: त्याने या सामन्यात 12 षटकार मारले, जे आयपीएल प्लेऑफच्या सामन्यात सर्वाधिक आहेत. यापूर्वी शुभमन गिलने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १० षटकार मारले होते.









