Home / क्रीडा / Vaibhav Suryavanshi: 15 व्या वर्षी टीम इंडियात एन्ट्री! आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची ‘इंडिया-ए’ संघात निवड

Vaibhav Suryavanshi: 15 व्या वर्षी टीम इंडियात एन्ट्री! आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची ‘इंडिया-ए’ संघात निवड

Vaibhav Suryavanshi India A squad selection 2026 : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाच्या चर्चेने जोर धरला आहे, ते म्हणजे वैभव...

By: Team Navakal
Vaibhav Suryavanshi India A squad selection 2026
Social + WhatsApp CTA

Vaibhav Suryavanshi India A squad selection 2026 : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाच्या चर्चेने जोर धरला आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या या 15 वर्षांच्या खेळाडूला बीसीसीआयने मोठे बक्षीस दिले आहे. श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी वैभवची ‘इंडिया-ए’ संघात निवड करण्यात आली आहे.

आयपीएलमधील वादळी कामगिरीचे फळ

वैभवने यंदाच्या आयपीएल हंगामात आपल्या फलंदाजीचा दर्जा सिद्ध केला. त्याने 11 सामन्यांत तब्बल 440 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट 236 इतका थक्क करणारा आहे. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे निवड समितीने त्याला थेट ‘इंडिया-ए’च्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

सचिन-युवराजचा विक्रम मोडला

बिहारकडून खेळणाऱ्या वैभवने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी रणजी पदार्पण करून सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर-19 कसोटीत त्याने फक्त 58 चेंडूत शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. आयपीएल 2025 मध्येही त्याने 7 सामन्यांत 252 धावा केल्या होत्या, पण 2026 चा हंगाम त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला.

तिलक वर्माकडे नेतृत्वाची धुरा

श्रीलंकेत 9 जूनपासून सुरू होणाऱ्या या तिरंगी मालिकेसाठी तिलक वर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग उपकर्णधार असेल. आयपीएलमध्ये चमकलेले प्रियांश आर्या, अंशुल कंबोज आणि सूर्यांश शेडगे यांसारख्या तरुण खेळाडूंचाही या 15 सदस्यीय संघात समावेश आहे.

इंडिया-ए संघ: तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बदोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्रा, विप्रज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

ही मालिका डंबुला येथे खेळवली जाणार असून, याकडे 2027 च्या विश्वचषकानंतर तयार होणाऱ्या नवीन टीम इंडियाची पायाभरणी म्हणून पाहिले जात आहे.

हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

Web Title:
संबंधित बातम्या