Home / लेख / Aadhaar Card Address Update: आता ‘या’ सोप्या पद्धतीने आधारवरील पत्ता करा अपडेट; जाणून घ्या नवीन नियम

Aadhaar Card Address Update: आता ‘या’ सोप्या पद्धतीने आधारवरील पत्ता करा अपडेट; जाणून घ्या नवीन नियम

Aadhaar Card Address Update Without Documents : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक सुविधा सुरू केली...

By: Team Navakal
Aadhaar Card Address Update
Social + WhatsApp CTA

Aadhaar Card Address Update Without Documents : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक सुविधा सुरू केली आहे. आता आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही वैयक्तिक कागदपत्रांची किंवा पुराव्याची सक्ती असणार नाही. विशेषतः ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर भाडेकरार किंवा रेशन कार्ड सारखे पुरावे नाहीत, अशा लोकांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे.

कुटुंब प्रमुखाच्या (HoF) मदतीने बदला पत्ता

UIDAI ने ‘हेड ऑफ फॅमिली’ (HoF) आधारित ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सोय दिली आहे. मुले, पती/पत्नी किंवा पालकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रमुखाच्या संमतीने त्यांच्या आधारवरील पत्ता तुमच्या कार्डवर अपडेट करू शकता. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती ‘कुटुंब प्रमुख’ म्हणून आपल्या नातेवाईकांना पत्ता शेअर करू शकते.

आवश्यक कागदपत्रे आणि पर्याय

पत्ता बदलण्यासाठी तुम्ही रेशन कार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट यांसारखे ‘नातेसंबंधाचा पुरावा’ (Proof of Relationship) वापरू शकता. या कागदपत्रात अर्जदार आणि कुटुंब प्रमुख या दोघांचे नाव असणे आवश्यक आहे. जर असे कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नसेल, तर कुटुंब प्रमुख स्वतः स्वाक्षरी केलेले ‘स्वयं-घोषणापत्र’ (Self-Declaration) देखील देऊ शकतात.

आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:

  1. सर्वप्रथम माय आधार (My Aadhaar) पोर्टलला भेट द्या: https://myaadhaar.uidai.gov.in
  2. पत्ता अपडेट करण्याचा नवीन पर्याय निवडा.
  3. कुटुंब प्रमुखाचा (HoF) आधार क्रमांक प्रविष्ट करा (त्यांची इतर खासगी माहिती तुम्हाला दिसणार नाही).
  4. नातेसंबंधाचा पुरावा असलेले दस्तऐवज अपलोड करा.
  5. आवश्यक शुल्क जमा करा.
  6. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा विनंती क्रमांक (SRN) मिळेल आणि कुटुंब प्रमुखाला एसएमएस (SMS) पाठवला जाईल.
  7. कुटुंब प्रमुखाला ३० दिवसांच्या आत पोर्टलवर लॉगिन करून तुमच्या विनंतीला मंजुरी द्यावी लागेल.

जर कुटुंब प्रमुखाकडून ३० दिवसांच्या आत मंजुरी मिळाली नाही किंवा त्यांनी विनंती नाकारली, तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. अशा परिस्थितीत भरलेले शुल्क परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

हे देखील वाचा – 

Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची पहिली गर्जना; ‘छत्रपती’ अँथम पाहून अंगावर येतील शहारे!

Indian Economy Ranking: भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण; जगातील पाचव्या क्रमांकावरून आता सहाव्या स्थानी, काय आहे कारण?

Delimitation 2026: लोकसभेच्या जागा वाढणार की राजकीय नकाशा बदलणार? काय आहे मतदारसंघ पुनर्रचना आणि उत्तर-दक्षिण वादाचे मुख्य कारण?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या