Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar : VSR की CMR?अजित पवारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘VSR’ विमानानेच सुनेत्रा पवारांनी प्रवास केला?; व्हायरल दाव्यांमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!”

Sunetra Pawar : VSR की CMR?अजित पवारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘VSR’ विमानानेच सुनेत्रा पवारांनी प्रवास केला?; व्हायरल दाव्यांमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!”

Sunetra Pawar : दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना होताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी...

By: Team Navakal
Sunetra Pawar
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना होताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी चार्टर विमानात अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे ही बाब लक्षात आली आणि एक मोठा संभाव्य अनर्थ टळला. मात्र, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर एका नव्या वादाला उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘व्ही.एस.आर.’ (VSR Aviation) कंपनीच्याच विमानाने सुनेत्रा पवार प्रवास करत होत्या, अशी जोरदार चर्चा सुरुवातीला रंगली होती. परंतु, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून अधिकृत असा खुलासा करण्यात आला की, संबंधित विमान व्ही.एस.आर. कंपनीचे नसून ‘सी.एम.आर.’ (CMR) कंपनीचे होते; जी आंध्र प्रदेशातील भाजप खासदार सी. एम. रमेश यांच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खाजगी विमानाचा वापर न करता ‘इंडिगो’ या व्यावसायिक विमान कंपनीच्या विमानाने दिल्लीला जाणे पसंत केले होते.

दोन तास विमानतळावरच खोळंबा; शेवटी दुरुस्तीनंतर उड्डाण-
अधिकच्या माहितीनुसार, ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे खाजगी चार्टर विमान मुंबई विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ऐनवेळी विमानाच्या इंजिन किंवा तांत्रिक रचनेत बिघाड असल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून विमान तब्बल दोन तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवावे लागले. अखेर अभियंत्यांनी सर्व तांत्रिक बाबींची कसून तपासणी आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर, हे विमान दोन तास उशिराने म्हणजेच रात्री ७ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले. या विमानामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हेदेखील प्रवास करत होते. विमानातील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर सर्व नेत्यांनी अखेर याच विमानाने आपला पुढील प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला आणि ते दिल्लीला पोहोचले.

“अजितदादा माझा भाऊ आणि राज्याचा उपमुख्यमंत्री होता, मला उत्तरे हवीत” – सुप्रिया सुळे
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “सुनेत्रा वहिनी नक्की कोणत्या कंपनीच्या विमानाने गेल्या होत्या, याची मला पूर्ण अधिकृत माहिती नाही. परंतु, जर खरोखरच प्रवासादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर हा अत्यंत चिंताजनक आणि गंभीर विषय आहे. प्रवासाच्या साधनांच्या सुरक्षेबाबत मी संसदेतही सातत्याने आवाज उठवत असते, त्यामुळे मला माझ्या वहिनींची आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांची काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच नेत्यांना सरकारी खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केलेले असताना, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी अजूनही अशा प्रकारे खाजगी विमाने किंवा हेलिकॉप्टर प्रवासासाठी का वापरतात, हाही एक प्रश्न आहे. खाजगी विमानांच्या देखभालीची (Maintenance) वारंवार तपासणी करणे आवश्यक असते. अजितदादांचा ज्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला, त्याबाबतची अनेक उत्तरे अजूनही आम्हाला मिळालेली नाहीत. एक बहीण म्हणून मला ती उत्तरे आज ना उद्या हवीच आहेत. अजितदादा केवळ माझा भाऊ नव्हता, तर या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. विमानाची देखभाल योग्य नव्हती का? तसे असेल तर त्याला जबाबदार कोण? आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्याही घरावर असा दुःखाचा दिवस येऊ नये.”

रोहित पवारांचा ‘एक्स’वरून घणाघात; ‘अहवालाची वाट पाहणारे सत्तेचे दलाल’
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या विमान प्रकरणावरून आणि यापूर्वी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालातील विलंबावरून सत्ताधाऱ्यांसह हितसंबंध जपणाऱ्या विरोधकांवरही अत्यंत तीव्र शब्दांत टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ‘X अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “अहमदाबाद विमान दुर्घटनेला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. नियमानुसार, अशा गंभीर विमान दुर्घटनांचा अंतिम तपास अहवाल एका वर्षाच्या आत जाहीर करणे बंधनकारक असते. मात्र, अद्यापही या अपघाताचा अंतिम अहवाल समोर आलेला नाही. विमान अपघात तपास यंत्रणेचा (AAIB) तपास हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्यात गुन्हेगारी तपासाचा समावेश नसतो, असे असूनही अहवाल जाणीवपूर्वक वेळेवर आणले जात नाहीत.”

नातेसंबंध आणि सत्तेच्या लालसेवर बोचरी टीका-
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे जात, ‘अजितदादांच्या अपघाताचा अंतिम अहवाल येऊ द्या, मग बघू’, अशी मवाळ भूमिका घेणाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत म्हटले की, “अशी सोयीची भूमिका घेणारे लोक हे ‘सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमकहराम आणि कृतघ्न’ आहेत. केवळ सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी काही लोक अशा प्रकारे आपल्याच नेत्याच्या मृत्यूच्या चौकशीबाबत उदासीनता दाखवत आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या