Home / लेख / iPhone Fold: पासपोर्टच्या आकारात येणार Apple चा पहिला फोल्डेबल फोन! भन्नाट डिझाइन आणि फीचर्स; पाहा कधी होणार लाँच?

iPhone Fold: पासपोर्टच्या आकारात येणार Apple चा पहिला फोल्डेबल फोन! भन्नाट डिझाइन आणि फीचर्स; पाहा कधी होणार लाँच?

iPhone Fold : स्मार्टफोनच्या दुनियेत नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या ॲपल कंपनीकडून आता एका क्रांतिकारी उत्पादनाची अपेक्षा केली जात आहे. गेल्या...

By: Team Navakal
iPhone Fold
Social + WhatsApp CTA

iPhone Fold : स्मार्टफोनच्या दुनियेत नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या ॲपल कंपनीकडून आता एका क्रांतिकारी उत्पादनाची अपेक्षा केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची चर्चा होती, तो iPhone Fold अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे, हा फोन सध्याच्या फोल्डेबल फोन्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि पासपोर्टच्या आकारात असू शकतो. ॲपल हा फोन सप्टेंबरमध्ये iPhone 18 सीरिजसोबत किंवा या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसपूर्वी लाँच करण्याची शक्यता आहे.

डिझाइनमध्ये मोठा बदल

सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश फोल्डेबल फोन्स हे लांब आणि अरुंद डिझाइनचे आहेत. मात्र, iPhone Fold मध्ये ॲपल ‘वाईडस्क्रीन’चा पर्याय देऊ शकते. याचे डिझाइन पूर्वीच्या ब्लॅकबेरी पासपोर्ट फोनची आठवण करून देणारे असेल.

  • स्क्रीन रेशो: यात 4:3 असा अस्पेक्ट रेशो असेल, ज्यामुळे व्हिडिओ पाहताना किंवा वाचन करताना युजर्सना मोठा आणि रुंद डिस्प्ले मिळेल.
  • वापरण्यास सोपा: हा फोन घडी घातल्यावर इतका छोटा होईल की तो तुमच्या खिशात किंवा हाताच्या तळव्यावर सहज मावेल.

आयपॅडसारखा अनुभव

जरी हा फोन iOS वर चालणार असला, तरी त्याचा इंटरफेस बराचसा आयपॅडसारखा (iPad) असेल. यामध्ये अनेक ॲप्ससाठी साईडबारची सुविधा दिली जाऊ शकते. युजर्सना एकाच वेळी दोन ॲप्स शेजारी-शेजारी वापरता येतील. यामुळे मल्टिटास्किंग करणे अधिक सोपे होईल.

बाजारातील चुरस वाढणार

ॲपलच्या या निर्णयामुळे सॅमसंग, गुगल आणि हुवावे यांसारख्या कंपन्यांनीही आतापासूनच वाईडस्क्रीन फोल्डेबल फोनवर काम करायला सुरुवात केली आहे. फोल्डेबल फोनची विक्री गेल्या काही काळात वाढली असली, तरी ॲपलच्या या क्षेत्रातील प्रवेशामुळे या श्रेणीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळू शकते.

किंमत आणि आव्हाने

मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत सुमारे 2,000 डॉलर्स (अंदाजे 1.65 लाख रुपये) असू शकते. पहिल्या जनरेशनचा हा फोन असल्याने यामध्ये बॅटरी लाईफ यांसारख्या काही तांत्रिक मर्यादा असू शकतात. मात्र, ॲपल या त्रुटी कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

हे देखील वाचा – 

PM Modi in Bengal: प्रचाराच्या धावपळीत मोदींनी चाखली 10 रुपयांच्या भेळीची चव; ताफा थांबवून छोट्याशा दुकानावर हजेरी, व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss Marathi 6 Winner: तन्वी कोलतेने मारली बाजी! ट्रॉफीसह जिंकली मोठी रक्कम; पाहा बक्षिसांची यादी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या