Bajaj Pulsar NS400Z Update: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) सध्या आपल्या 400 सीसी श्रेणीतील गाड्यांना 350 सीसी सेगमेंटमध्ये हलवत आहे. केंद्र सरकारच्या नवीन GST 2.0 नियमांचा फायदा घेण्यासाठी आणि कररचनेत सवलत मिळवण्यासाठी कंपनीने ही रणनीती आखली आहे.
याचाचचा भाग म्हणून आता कंपनीने आपली सर्वात लोकप्रिय आणि पॉवरफुल बाईक Pulsar NS400Z नवीन इंजिनसह बाजारात उतरवली आहे.
Bajaj Pulsar NS400Z Update: काय झाला आहे बदल?
या अपडेटमधील सर्वात मोठा बदल म्हणजे बाईकचे इंजिन. नवीन बजाज पल्सर NS400Z मध्ये आता 349 सीसीचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. यापूर्वी या बाईकमध्ये 373 सीसीचे इंजिन असायचे. हे नवीन इंजिन 40bhp ची पॉवर आणि 33.2Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन डोमिनार 400 मध्येही वापरले जात आहे. जरी जुन्या इंजिनच्या तुलनेत पॉवरमध्ये किंचित घट झाली असली, तरी यामुळे इंजिन अधिक स्मूथ झाले असून शहरात गाडी चालवण्याचा अनुभव अधिक चांगला होईल.
Bajaj Pulsar NS400Z Update: डिझाइन आणि फीचर्स
बाईकच्या लुकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरुणांना आकर्षित करणारा तोच आक्रमक स्ट्रीटफाइटर लूक, शार्प बॉडी पॅनेल आणि मस्क्युलर बॉडी कायम ठेवण्यात आली आहे. फीचर्सच्या बाबतीतही ही बाईक सरस आहे:
- सस्पेंशन: फ्रंटला अपसाइड-डाउन फोर्क्स आणि रिअरला मोनोशॉक सस्पेंशन.
- सुरक्षा: ड्युअल-चॅनल एबीएस (ABS) आणि ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधा.
- मोड्स: विविध राइड मोड्स ज्यामुळे कोणत्याही रस्त्यावर बाईक चालवणे सोपे होते.
Bajaj Pulsar NS400Z Update: किंमत
इंजिनमध्ये इतका मोठा बदल करूनही बजाजने (Bajaj Auto) ग्राहकांचे खिसे जड होऊ दिलेले नाहीत. या बाईकची किंमत आजही 1.93 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकीच आहे. याआधी कंपनीने केटीएम, ट्रायम्फ आणि डोमिनार 400 सारख्या मॉडल्समध्येही असेच बदल केले आहेत. पल्सर सिरीजमधील ही शेवटची बाईक होती जिचे इंजिन अपडेट व्हायचे राहिले होते.
बजाजचा हा निर्णय विशेषतः अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांना कमी किमतीत आणि कमी टॅक्समध्ये एक पॉवरफुल बाईक हवी आहे.
हे देखील वाचा –
Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला










