CNG vs Electric Car: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत रोजच्या प्रवासासाठी खिशाला परवडणारी कार कोणती, असा विचार प्रत्येक जण करत आहे. इंधनाच्या या टेन्शनमुळे भारतीय बाजारपेठेत सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी कमालीची वाढली आहे.
तुमचे बजेट जर 10 लाख रुपयांच्या आसपास असेल आणि तुम्ही सीएनजी की इलेक्ट्रिक या संभ्रमात असाल, तर खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी दोन्ही गाड्यांचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
CNG vs Electric Car: १० लाखांच्या बजेटमधील पर्याय
१० लाख रुपयांच्या श्रेणीत भारतीय बाजारपेठेत दोन्ही सेगमेंटमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत:
- सीएनजी गाड्यांचे पर्याय: या बजेटमध्ये मारुती सुझुकीची वॅगनआर सीएनजी, स्विफ्ट सीएनजी, बलेनो सीएनजी आणि टाटा मोटर्सच्या काही लोकप्रिय सीएनजी गाड्या सहज मिळतात.
- इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्याय: इव्हि सेगमेंटचा विचार केला तर टाटा मोटर्सची टियागो इव्हि आणि एमजी कंपनीच्या काही सुरुवातीच्या श्रेणीतील इलेक्ट्रिक गाड्या १० लाखांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, प्रगत फीचर्स आणि मोठ्या बॅटरी क्षमतेनुसार इव्हिची किंमत वाढते.
CNG vs Electric Car: रनिंग कॉस्ट: दोन्ही गाड्यांचा खर्च किती?
गाडी चालवण्याच्या दैनंदिन खर्चाचा विचार केला तर दोन्हीमध्ये मोठा फरक दिसून येतो.
- इलेक्ट्रिक कारचा खर्च: एक इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी प्रति किलोमीटर केवळ 1 ते 1.5 रुपये खर्च येतो.
- सीएनजी कारचा खर्च: सीएनजी गाडी चालवण्यासाठी प्रति किलोमीटर साधारणपणे 2.5 ते 3 रुपये खर्च येतो.
जर तुमचा रोजचा प्रवास खूप जास्त असेल, तर दीर्घकाळासाठी इलेक्ट्रिक कार तुमच्या पैशांची अधिक बचत करू शकते. मात्र, यासाठी घरापाशी चार्जिंगची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे, सीएनजी गाड्यांमध्ये गॅस भरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि आता सीएनजी स्टेशनची संख्याही पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे.
CNG vs Electric Car: रेंज आणि मायलेजमधील फरक
इलेक्ट्रिक गाड्यांची तंत्रज्ञान क्षमता आणि रेंज दिवसेंदिवस सुधारत असली, तरी लहान शहरांमध्ये आणि हायवेवर अजूनही चार्जिंग स्टेशन मर्यादित आहेत.
दुसरीकडे, सीएनजी कारमध्ये एकदा गॅस फुल केल्यानंतर ती सहज 200 ते 300 किलोमीटरपर्यंत धावू शकते. सर्वात मोठा फायदा म्हणजे सीएनजी संपल्यास ही गाडी पेट्रोलवरही चालवता येते. याच कारणामुळे अनेक जण लांबच्या प्रवासासाठी सीएनजी गाड्यांना अधिक सुरक्षित पर्याय मानतात.
CNG vs Electric Car: तुमच्यासाठी कोणता पर्याय ठरेल सर्वोत्तम?
सीएनजी कार कधी खरेदी करावी?: जर तुम्ही लहान शहरात राहत असाल, हायवेवर वारंवार लांबचा प्रवास करावा लागत असेल आणि कमी बजेटमध्ये देखभालीसाठी सोपा पर्याय हवा असेल, तर तुमच्यासाठी सीएनजी कार आजही उत्तम ठरेल.
इलेक्ट्रिक कार कधी खरेदी करावी?: जर तुमचा प्रवास प्रामुख्याने शहरांतर्गत असेल, घरी गाडी चार्ज करण्याची उत्तम सोय असेल आणि तुम्हाला भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे असेल, तर इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
हे देखील वाचा – Sai Sudharsan Hit Wicket: बॅट हातातून सुटली अन् स्टम्प्सवर पडली! गुजरातचा साई सुदर्शन अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद; पाहा व्हिडिओ










