Home / लेख / E20 Petrol : गाडीत E20 पेट्रोल भरत असाल तर सावधान! इंजिनची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ उपाय

E20 Petrol : गाडीत E20 पेट्रोल भरत असाल तर सावधान! इंजिनची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ उपाय

E20 Petrol : देशात वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ‘इथॅनॉल’ या पर्यायी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर...

By: Team Navakal
E20 Petrol : गाडीत E20 पेट्रोल भरत असाल तर सावधान! इंजिनची काळजी घेण्यासाठी करा 'हे' उपाय
Social + WhatsApp CTA

E20 Petrol : देशात वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने ‘इथॅनॉल’ या पर्यायी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. सध्या बहुतांश पेट्रोल पंपांवर २०% इथॅनॉल मिश्रित असलेले ‘E20 पेट्रोल’ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

सरकारचे हे पाऊल पर्यावरणासाठी नक्कीच पूरक आहे, मात्र यामुळे एप्रिल २०२३ पूर्वी तयार झालेल्या जुन्या गाड्यांच्या मालकांची चिंता कमालीची वाढली आहे.

या जुन्या कार आणि बाईक अधिक इथॅनॉल असलेल्या इंधनासाठी डिझाइन केलेल्या नाहीत. परिणामी, या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज अचानक घटणे, इंजिनचे अंतर्गत भाग खराब होणे आणि पेट्रोल टाकीत गंज लागणे अशा गंभीर समस्या समोर येत आहेत. तुमची जुनी गाडी या मोठ्या नुकसानापासून वाचवायची असेल, तर ऑखालील उपाय त्वरित अंमलात आणा.

गाडीचे हजारो रुपये वाचवण्यासाठी करा ‘हे’ ४ महत्त्वाचे बदल

इंजिन सुरक्षित ठेवण्यासाठी ऑटो एक्सपर्ट्सनी खालील मुद्द्यांचा क्रमाने वापर करण्याचा सल्ला दिला आहे:

  • १. ‘फ्यूल फिल्टर’ वेळेपूर्वीच बदलून घ्या: सामान्यतः अनेक जण गाडी बंद पडेपर्यंत फ्यूल फिल्टर बदलत नाहीत, पण E20 पेट्रोलच्या काळात ही चूक महागात पडू शकते. इथॅनॉलमुळे पेट्रोल टाकीच्या आतील जुनी घाण आणि गंज उखडला जातो, जो थेट फिल्टरमध्ये जाऊन अडकतो. यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स खराब होतो. म्हणूनच, कंपनीच्या मॅन्युअलची वाट न पाहता दर १५,००० ते २०,००० किलोमीटरवर फिल्टर नक्की बदला.
  • २. रबर सील्स आणि गॅस्केट अपग्रेड करा: इथॅनॉलमध्ये रबर आणि प्लास्टिकचे भाग वेगाने विरघळवण्याचा गुणधर्म असतो. जुन्या गाड्यांमधील पारंपारिक रबर पाईप्स आणि गॅस्केट हा मारा सहन करू शकत नाहीत आणि ते फाटून इंधन गळतीचा धोका निर्माण होतो. यासाठी तुमच्या मेकॅनिककडे जाऊन हे रबरचे पार्ट्स विटॉन किंवा टेफ्लॉन सारख्या आधुनिक इथॅनॉल-फ्रेंडली मटेरियलने अपग्रेड करून घ्या.
  • ३. गाडी जास्त दिवस गॅरेजमध्ये बंद ठेवू नका: जर तुम्ही तुमची जुनी गाडी अनेक आठवडे किंवा महिने एकाच जागी उभी करून ठेवत असाल आणि त्यात E20 पेट्रोल असेल, तर ते इंजिनसाठी सर्वात घातक ठरेल. इथॅनॉल हवेतील आर्द्रता वेगाने शोषून घेते, ज्यामुळे पेट्रोल आणि पाणी वेगळे होऊन पाणी टाकीच्या तळाशी साचते. यामुळे इंजिनला आतून गंज लागतो. त्यामुळे गाडी नियमितपणे चालवत राहा.
  • ४. ‘फ्यूल सिस्टम क्लीनर’चा नियमित वापर करा: इंजिनला सुरक्षित ठेवण्याचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे फ्यूल सिस्टम क्लीनर. पेट्रोल भरताना योग्य प्रमाणात हे अ‍ॅडिटिव्ह लिक्विड टाकीत टाका. हे लिक्विड इंजिनच्या फ्यूल लाईन्समध्ये इथॅनॉलमुळे जमा होणारा कचरा आणि ओलावा साफ ठेवते. बाजारात हे सहज १०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान मिळते, जे इंजिनचा हजारो रुपयांचा दुरुस्ती खर्च वाचवू शकते.

हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या