Home / लेख / तब्बल 12 हजारांची थेट सूट! Flipkart वर Google चा प्रीमियम 5जी फोन मिळतोय खूप स्वस्तात, पाहा ऑफर्स

तब्बल 12 हजारांची थेट सूट! Flipkart वर Google चा प्रीमियम 5जी फोन मिळतोय खूप स्वस्तात, पाहा ऑफर्स

Google Pixel 9a Discount: जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा आणि कडक फीचर्स असलेला गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल,...

By: Team Navakal
तब्बल 12 हजारांची थेट सूट! Flipkart वर Google चा प्रीमियम 5जी फोन मिळतोय खूप स्वस्तात, पाहा ऑफर्स
Social + WhatsApp CTA

Google Pixel 9a Discount: जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा आणि कडक फीचर्स असलेला गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सध्या एक उत्तम संधी चालून आली आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ‘गुगल पिक्सेल ९ए’ या ५जी स्मार्टफोनवर प्रचंड सूट दिली जात आहे.

हा स्मार्टफोन मार्च २०२५ मध्ये ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या डिस्काउंटमुळे हा फोन खरेदी करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. थेट किमतीतील कपातीसोबतच बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊन युजर्स हा फोन अतिशय बजेट किमतीत स्वतःचा करू शकतात.

पाहा किती रुपयांना मिळणार फोन? किमतीचे गणित

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटवर मिळणाऱ्या ऑफर्स खालीलप्रमाणे आहेत:

  • थेत विक्री किंमत: हा स्मार्टफोन सध्या वेबसाईटवर ३९,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, म्हणजेच यावर थेट १०,००० रुपयांची कपात झाली आहे.
  • बँक डिस्काउंट ऑफर: फ्लिपकार्टवर एसबीआई बँक क्रेडिट कार्डचा वापर करून व्यवहार केल्यास ग्राहकांना २,००० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे या फोनची प्रभावी किंमत ३७,९९९ रुपयांपर्यंत खाली येते.
  • जबरदस्त एक्सचेंज ऑफर: जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, तर तुम्हाला तब्बल ३५,६०० रुपयांपर्यंतची कमाल सवलत मिळू शकते. अर्थात, ही सवलत तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि सद्यस्थितीवर अवलंबून असेल.

दमदार प्रोसेसर आणि कडक डिस्प्ले फीचर्स

किंमत कमी झाली असली तरी या फोनचे फीचर्स आजच्या काळातील कोणत्याही फ्लॅगशिप फोनला कडक टक्कर देतात:

  • अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले: या फोनमध्ये ६.३ इंचाचा एक्टुआ पीओएलईडी डिस्प्ले मिळतो, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७०० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ज्यामुळे उन्हातही स्क्रीन एकदम स्पष्ट दिसते.
  • तगडा परफॉर्मन्स: वेगवान कामगिरीसाठी या फोनमध्ये गुगलचा शक्तिशाली टेन्सर जी४ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १६ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
  • वजन आणि साईझ: या फोनची लांबी १५४.७ मिमी, रुंदी ७३.३ मिमी, जाडी ८.९ मिमी आणि वजन १८५.९ ग्रॅम आहे, ज्यामुळे हातात पकडण्यासाठी हा फोन अतिशय सुटसुटीत आहे.

४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी

फोटोग्राफीच्या बाबतीत गुगलचे फोन नेहमीच किंग मानले जातात. या मॉडेलमध्येही कंपनीने उत्कृष्ट कॅमेरा सिस्टीम दिली आहे:

  • कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूला ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्ट असलेला ४८ मेगापिक्सलचा मुख्य प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो.
  • सेल्फी कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • कनेक्टिव्हिटीचे पर्याय: आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय ६ई, ब्लूटूथ ५.३, एनएफसी, जीपीएस, भारतीय जीपीएस प्रणाली नेव्हिक (NavIC) आणि यूएसबी ३.२ टाईप सी पोर्ट यांसारखे सर्व आवश्यक पर्याय उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा – India US Relations: “मोदी आहेत तोपर्यंत भारतावर हल्ला झाल्यास…”; जी-7 परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या