Pani Puri Viral Video: चटपटीत समोसे असोत किंवा मसाल्यांनी भरलेली पाणीपुरी, भारतीय स्ट्रीट फूडची चवच काही न्यारी आहे. आता याच पाणीपुरीच्या प्रेमात एक जपानी उद्योजिका पडली असून तिची पोस्ट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. ‘हर्मीस’ नावाच्या या जपानी महिलेने चक्क स्वतःचे पाणीपुरीचे दुकान सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“पाणीपुरीचे व्यसनच लागले!”
हर्मीसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली ही ओढ व्यक्त करताना लिहिले की, “मला पाणीपुरीचे इतके वेड लागले आहे की, मी आता स्वतःचे एक छोटे दुकान सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे, जिथे लोक फिरता फिरता सहज पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकतील.”
विशेष म्हणजे, तिच्या पतीला विदेशी पदार्थ फारसे आवडत नाहीत, मात्र त्यांनाही आता पाणीपुरीची चटक लागली आहे. हर्मीस आता आठवड्यातून किमान 2 वेळा पाणीपुरी खाते आणि तिने घरी बनवण्यासाठी ‘पाणीपुरी किट’ सुद्धा विकत घेतले आहे.
今日も食べてる笑
— エルメス (@hermes_ooo) April 20, 2026
マジで日本人女性私だけ、1人で無言で食べてる✌️(新大久保に多数お店があり、イートインでさくっと食べられるお店が何店舗もあります) pic.twitter.com/6aqBXDtLbA
एकट्याने घेते पाणीपुरीचा आनंद
दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “अनेकदा मी स्थानिक दुकानांमध्ये एकटीच शांतपणे पाणीपुरी खाणारी एकमेव जपानी महिला असते.” पाणीपुरी खाण्यासाठी अनेक ‘क्विक स्टॉप’ उपलब्ध असल्याचेही तिने नमूद केले.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
हर्मीसच्या या पोस्टवर भारतीय युजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला पाणीपुरीचे इतर प्रकार जसे की, बंगालमधील ‘पुचका’, मुंबईची ‘सेव पुरी’ आणि ‘दही पुरी’ ट्राय करण्याचा सल्ला दिला आहे.
“विदेशी लोकांनाही भारतीय पाणीपुरी इतकी आवडते, हे पाहून खूप आनंद झाला,” अशी कमेंट एका युजरने केली. तर एका दुसऱ्या जपानी युजरने म्हटले की, “पाणीपुरीची चव खरोखरच अद्भूत आहे, मलाही आता हे शिकण्यासाठी भारत किंवा नेपाळला जावेसे वाटतेय.”
एकूणच, भारतीय चवीने आता जपानमधील लोकांच्या जिभेवरही राज्य करण्यास सुरुवात केली आहे, हे यावरून स्पष्ट होते.
हे देखील वाचा –
Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला











