Lava Bold N2 5G Sale : भारतीय स्मार्टफोन निर्माती कंपनी लावाने आपल्या लोकप्रिय सीरिजमधील नवीन अपग्रेडेड फोन ग्राहकांसाठी सादर केला आहे. काही दिवसांपूर्वीच अनावरण झालेल्या या ५G डिव्हाइसची पहिली अधिकृत विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी आलेल्या जुन्या मॉडेलची जागा घेणार असून यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
ग्राहकांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, कंपनी या फोनसोबत एक विशेष योजना देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही समस्येसाठी सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज भासणार नाही, तर कंपनीचे तंत्रज्ञ थेट घरी यातील आणि मोफत तांत्रिक मदत तसेच दुरुस्तीची सुविधा पुरवतील.
Lava Bold N2 5G Sale : ६००0mAh ची महाकाय बॅटरी आणि वेगवान चार्जिंग
या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील ६००0mAh क्षमतेची सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी १८W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर यामध्ये सलग 815 मिनिटांपर्यंत युट्यूब व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि तब्बल 743 मिनिटांचा स्क्रीन-ऑन टाईम मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. यामुळे प्रवासात किंवा कामात असताना वारंवार फोन चार्ज करण्याची कटकट संपणार आहे.
Lava Bold N2 5G Sale : स्मूथ डिस्प्ले आणि पॉवरफुल परफॉर्मन्स
कमी बजेटमध्ये गेमिंग आणि सोशल मीडियाचा उत्तम अनुभव देण्यासाठी या फोनमध्ये खालील फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत:
- मोठी स्क्रीन आणि रिफ्रेश रेट: फोनमध्ये 6.75 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, ज्यामुळे स्क्रोलिंगचा अनुभव अतिशय वेगवान आणि स्मूथ मिळतो.
- प्रोसेसर: हा फोन 6nm तंत्रज्ञानावर आधारित ऑक्टा-कोर युनिसॉक टी8200 चिपसेटवर चालतो, ज्याला माली-जी57 जीपीयूची जोड दिली आहे. कंपनीच्या मते, हा प्रोसेसर ५ लाखांपेक्षा जास्त अंतूतू स्कोअर प्रदान करतो.
- सुरक्षा आणि डिझाईन: फोनच्या वरच्या भागात एक नॉच डिझाईन आहे आणि सुरक्षेसाठी बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. तसेच धूळ आणि पाण्याचे शिंतोडे झेलण्यासाठी याला आयपी64 रेटिंग मिळाले आहे.
मेमरी आणि कॅमेरा फीचर्स
या फोनमध्ये डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ॲप्स चालवण्यासाठी 4GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज मिळते. जर तुम्हाला जास्त फोटो किंवा व्हिडिओ साठवायचे असतील, तर स्वतंत्र मेमरी कार्ड स्लॉटच्या मदतीने स्टोरेज थेट 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये अत्यंत साधा आणि सोपा कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील बाजूस एआय तंत्रज्ञानावर आधारित 13MP का मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांसाठी रीगल गोल्ड आणि बिलियनेयर ब्लू अशा दोन सुंदर रंगांमध्ये आणला गेला आहे.
Lava Bold N2 5G ची किंमत आणि ऑफर्स
किंमतीचा विचार करता लावाचा हा नवीन फोन लोअर मिड-रेंज ५G श्रेणीमध्ये एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. ग्राहकांसाठी किमतीचे गणित पुढीलप्रमाणे आहे:
१. ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज (मूळ किंमत): या फोनची अधिकृत किंमत 12,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
२. लाँचिंग ऑफर अंतर्गत किंमत: पहिल्या विक्रीअंतर्गत कंपनी ग्राहकांना विशेष सवलत देत असून, हा फोन सध्या केवळ 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन आज दुपारपासून ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
हे देखील वाचा – India Protest US Attack: समुद्रात अमेरिकेचा व्यापारी जहाजावर हल्ला; 3 भारतीय बेपत्ता, भारताने अमेरिकन राजदूतांना बजावले समन्स










