Redmi Smartphone Sale : स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेडमीने आपली नवीन ‘रेडमी ए7’ (Redmi A7 4G) सिरीज भारतात विक्रीसाठी खुली केली आहे. या सिरीजमध्ये Redmi A7 4G आणि Redmi A7 Pro 4G हे दोन स्मार्टफोन समाविष्ट आहेत.
आकर्षक डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी असलेल्या या फोनची विक्री आता अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत स्टोअर्सवर सुरू झाली आहे.
Redmi Smartphone Sale : किंमत आणि रंगांचे पर्याय
- Redmi A7 4G (3GB+64GB): या फोनची किंमत 10,999 रुपये असून शाओमीच्या वेबसाईटवर तो 10,499 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन निळ्या आणि काळ्या रंगात मिळतो.
- Redmi A7 Pro 4G (4GB+64GB): या प्रो मॉडेलची किंमत 11,999 रुपये असून ऑफरमध्ये तो 11,499 रुपयांना मिळत आहे. हा फोन काळ्या आणि केशरी रंगात सादर करण्यात आला आहे.
Redmi Smartphone Sale : डिस्प्ले आणि परफॉर्मन्स
रेडमी ए7 प्रो मध्ये 6.9 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची ब्राइटनेस 800 निट्स आहे. तर, बेस मॉडेलमध्ये 6.88 इंचाचा डिस्प्ले मिळतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट असल्याने स्क्रीन वापरण्याचा अनुभव अत्यंत स्मूथ मिळतो. या दोन्ही फोन्समध्ये ‘युनिसोक टी7250’ हा प्रोसेसर वापरण्यात आला असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2 टीबीपर्यंत वाढवता येते.
Redmi Smartphone Sale : सॉफ्टवेअर आणि अपडेट्स
सॉफ्टवेअरच्या बाबतीत प्रो मॉडेल अधिक प्रगत आहे. यामध्ये ‘अँड्रॉइड 16’ वर आधारित हायपर ओएस 3 देण्यात आले असून, कंपनीने 4 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे. दुसरीकडे, रेडमी ए7 मध्ये ‘अँड्रॉइड 15’ वर आधारित हायपर ओएस 2 असून त्याला 2 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स मिळतील.
कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप
फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीच्या बाबतीतही हे फोन सरस आहेत:
Redmi A7 Pro: 6,300 mAh ची अवाढव्य बॅटरी.
Redmi A7: 5,200 mAh ची बॅटरी. दोन्ही फोन 15 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतात. तसेच यामध्ये धुळीपासून संरक्षणासाठी आयपी 52 रेटिंग देण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील उपलब्ध आहे.
हे देखील वाचा –









