Samsung Galaxy S26+: जर तुम्ही सॅमसंग कंपनीचा मोठा डिस्प्ले आणि अद्ययावत फीचर्स असलेला एखादा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या सॅमसंगच्या अत्यंत लोकप्रिय ‘Samsung Galaxy S26+’ या फोनवर प्रचंड प्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे. या विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा तब्बल 37,000 रुपयांपेक्षा जास्त रुपयांची थेट बचत करण्याची संधी मिळत आहे.
हा फोन खरेदी करणे सध्या ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा सौदा ठरत आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये 1,19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन आता बजेटच्या परिघात आला आहे. या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्स, बँक सवलत आणि त्याचे सर्व भन्नाट फीचर्स खालीलप्रमाणे सविस्तर आहेत.
किंमत, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा असा घ्या लाभ:
अॅमेझॉनवर या प्रीमियम स्मार्टफोनची किंमत खालीलप्रमाणे कमी झाली आहे:
- थेट डिस्काउंट: सॅमसंग गॅलेक्सी S26+ चा 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेला व्हेरियंट अॅमेझॉनवर सध्या फक्त 84,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध करण्यात आला आहे.
- बँक क्रेडिट कार्ड ऑफर: जर ग्राहक हा फोन खरेदी करताना आयसीआईसीआई बँकेच्या अॅमेझॉन पे क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करतील, तर त्यांना 2,549 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. यामुळे या फोनची प्रभावी किंमत केवळ 82,450 रुपये इतकी खाली येईल.
- बंपर एक्सचेंज ऑफर: तुमच्याकडे असलेला जुना किंवा सध्याचा कार्यरत स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 34,600 रुपये रुपयांपर्यंतचा अतिरिक्त नफा मिळू शकतो. मात्र, ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या सद्यस्थितीवर अवलंबून असेल.
सॅमसंग गॅलेक्सी S26+ चे अद्ययावत फीचर्स आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स:
या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये कंपनीने उत्कृष्ट दर्जाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दिले आहे:
- डाईनॅमिक डिस्प्ले: या फोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डायनॅमिक अॅमोलेड 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेझोल्यूशन 1440×3120 पिक्सल्स असून तो 120Hz च्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी स्क्रीनवर अत्याधुनिक कॉर्निग गोरिल्ला आर्मर 2 चे संरक्षण दिले आहे.
- पॉवरफुल प्रोसेसर आणि ओएस: हा फोन अँड्रॉइड 16 या नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित वनयुआय 8.5 वर काम करतो. यामध्ये सॅमसंगचा स्वतःचा शक्तिशाली डेका-कोर एक्सिनोस 2600 हा अत्याधुनिक प्रोसेसर बसवण्यात आला आहे.
- दमदार बॅटरी क्षमता: दीर्घकाळ बॅकअपसाठी यामध्ये 4,900mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 45W च्या फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी फोनच्या स्क्रीनमध्येच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर समाविष्ट आहे.
डीएसएलआर सारखा कॅमेरा सेटअप आणि कनेक्टिव्हिटी
फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी या फोनमध्ये मागे ३ कॅमेऱ्यांचा सेटअप मिळतो. यात मुख्य कॅमेरा f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन (OIS) सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा आहे. दुसरा f/2.4 अपर्चर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे, तर तिसरा f/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G नेटवर्क, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि अत्याधुनिक युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये जायरोस्कोप, ई-कंपास, अॅक्सलेरोमीटर, बॅरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांसारखे सर्व आवश्यक सेन्सर्स उपलब्ध आहेत. या फोनचे एकूण वजन केवळ 190 ग्रॅम असून त्याची जाडी फक्त 7.3 मिमी इतकी स्लिम आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा










