Home / लेख / Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा सर्वात महागडा प्रीमियम फोन 15,000 रुपयांनी स्वस्त; अ‍ॅमेझॉनवर खरेदीची सुवर्णसंधी

Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा सर्वात महागडा प्रीमियम फोन 15,000 रुपयांनी स्वस्त; अ‍ॅमेझॉनवर खरेदीची सुवर्णसंधी

Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. कंपनीचा...

By: Team Navakal
Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा सर्वात महागडा प्रीमियम फोन 15,000 रुपयांनी स्वस्त; अ‍ॅमेझॉनवर खरेदीची सुवर्णसंधी
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. कंपनीचा सर्वात लोकप्रिय फ्लॅगशिप फोन ‘सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा’ सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अतिशय स्वस्त दरात उपल्बध करण्यात आला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता त्याची मूळ लाँचिंग किंमत मोजावी लागणार नाही.

अ‍ॅमेझॉनने या प्रीमियम फोनवर थेट किंमत कपात केली असून, सोबतच काही निवडक बँकांच्या कार्ड्सवर अतिरिक्त सवलतही जाहीर केली आहे.

किंमतीचे गणित: एकूण १५,००० रुपयांचा बंपर फायदा

हा फोन लाँच झाला तेव्हाची किंमत आणि सध्या अ‍ॅमेझॉनवर मिळणाऱ्या ऑफर्सचे गणित खालीलप्रमाणे आहे:

  • थेट सवलत: या फोनची मूळ लाँचिंग किंमत 1,39,999 रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉनवर सध्या हा फोन 1,30,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना थेट 9,000 रुपये सपाट डिस्काउंट मिळत आहे.
  • एचएसबीसी बँक ऑफर: जर तुम्ही खरेदीसाठी एचएसबीसी (HSBC) बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले, तर तुम्हाला अतिरिक्त 6,000 रुपयांची मोठी सूट मिळेल. ही ऑफर लागू केल्यास फोनची प्रभावी किंमत थेट 1,24,999 रुपयांवर येईल. म्हणजेच एकूण 15,000 रुपयांची बचत होईल.
  • इतर बँकांच्या ऑफर्स: जर तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला 4,500 रुपयांची सूट मिळून फोन 1,26,499 रुपयांना पडेल. तसेच आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या क्रेडिट कार्डवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट असून फोन 1,26,999 रुपयांना खरेदी करता येईल.

या आकर्षक किमतीमुळे हा फोन सध्याच्या घडीला बाजारातील सर्वात स्पर्धात्मक आणि सर्वोत्तम अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन बनला आहे.

आता S26 अल्ट्रा घ्यावा की आगामी S27 अल्ट्राची वाट पाहावी?

जर तुम्हाला नवीन फोनची सध्या तातडीने गरज असेल आणि तुम्हाला एक सर्वोत्तम डिव्हाइस हवे असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा हा डोळे झाकून घेण्यासारखा पर्याय आहे. यामध्ये दमदार परफॉर्मन्स, अष्टपैलू कॅमेरा सेटअप, प्रीमियम बिल्ड कॉलिटी, एस-पेनचा सपोर्ट आणि अनेक वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात.

मात्र, जर तुम्ही पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत थांबू शकत असाल, तर आगामी ‘सॅमसंग गॅलेक्सी S27 अल्ट्रा’ अधिक कडक फीचर्ससह बाजारात येण्याची शक्यता आहे. लीक्सनुसार आगामी मॉडेलमध्ये खालील मोठे बदल पाहायला मिळू शकतात:

  • ६०००mAh ची महाकाय बॅटरी: सॅमसंग गेल्या ७ पिढ्यांपासून आपल्या अल्ट्रा सिरीजमध्ये ५०००mAh ची बॅटरी देत आहे. परंतु, आगामी मॉडेलमध्ये सिलिकॉन-कार्बन तंत्रज्ञानावर आधारित थेट 6,000 mAh पेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
  • २nm प्रगत प्रोसेसर: यात नवीन पिढीचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल, जो 2nm तंत्रज्ञानावर तयार केला जाईल. तसेच फोन थंड ठेवण्यासाठी लिक्विड कूलिंग सिस्टीम वापरली जाण्याची शक्यता आहे.
  • इतर फीचर्स: नवीन ओलेड डिस्प्ले, एलपीडीडीआर६ रॅम, नवीन मुख्य कॅमेरा सेन्सर आणि क्यूआय२ वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची चर्चा आहे.

तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

आगामी सॅमसंग गॅलेक्सी S27 अल्ट्रा हा फोन साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२७ च्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यासाठी तुम्हाला अनेक महिने वाट पाहावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन फोन लाँच होताना त्याची किंमत खूप जास्त असेल.

त्यामुळे सध्याच्या घडीला 1,24,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा खरेदी करणे हा एक अतिशय फायदेशीर आणि कडक सौदा आहे. ज्या ग्राहकांना आणखी काही महिने थांबणे शक्य आहे, त्यांनी दिवाळीच्या सेलपर्यंत वाट पाहावी; कारण त्या काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वर्षातील सर्वात मोठा डिस्काउंट दिला जातो.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या