Home / लेख / Skoda कार खरेदीवर तब्बल 3.50 लाखांची बंपर सूट! Kushaq, Slavia सह ‘या’ गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Skoda कार खरेदीवर तब्बल 3.50 लाखांची बंपर सूट! Kushaq, Slavia सह ‘या’ गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Skoda Car Discounts: नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक उत्तम बातमी आहे. Skoda Auto India ने मे 2026 या...

By: Team Navakal
Skoda कार खरेदीवर तब्बल 3.50 लाखांची बंपर सूट! Kushaq, Slavia सह 'या' गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट
Social + WhatsApp CTA

Skoda Car Discounts: नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक उत्तम बातमी आहे. Skoda Auto India ने मे 2026 या महिन्यासाठी आपल्या लोकप्रिय गाड्यांवर भरघोस डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी प्रामुख्याने आपल्या जुन्या स्टॉकवर मोठा डिस्काउंट देत आहे, तर नवीन गाड्यांवर थोडे कमी फायदे मिळत आहेत.

कारचे मॉडेल आणि व्हेरियंटनुसार ग्राहकांना रोख सूट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट ऑफर्स आणि लॉयल्टी बेनिफिट्सच्या माध्यमातून तब्बल 3.50 लाख रुपयांपर्यंतचा थेट फायदा मिळू शकतो. डीलरशिप स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि शोरूममध्ये या ऑफर्समध्ये थोडा बदल असूठ शकतो.

कोणत्या मॉडेलवर किती सूट मिळत आहे, त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. Skoda Kushaq: एकूण फायदा ३ लाख रुपये

  • जुना स्टॉक: Kushaq च्या Onyx, Signature, Sportline, Prestige आणि Monte Carlo या जुन्या मॉडेल्सवर 2 लाख रुपयांचा थेट कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच 50,000 रुपयांचा कॉर्पोरेट किंवा लॉयल्टी बोनस आणि 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज सपोर्ट मिळत आहे. म्हणजेच ठराविक व्हेरियंटवर एकूण 3 लाख रुपयांचा फायदा होईल.
  • नवीन स्टॉक: Kushaq च्या नवीन मॉडेल्सवर आगामी ऑफर्स मर्यादित आहेत. Signature आणि Sportline व्हेरियंटवर एक्सचेंज आणि लॉयल्टी स्कीम अंतर्गत 40,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तर टॉप-एंड Prestige आणि Monte Carlo वर 20,000 रुपये पर्यंतचा फायदा मिळेल. Classic+ व्हेरियंटवर कोणतीही ऑफर नाही.

2. Skoda Slavia: एकूण फायदा १.४० लाखांपर्यंत

  • जुना स्टॉक: Slavia च्या Prestige 1.0 TSI MT या मॉडेलवर सर्वाधिक म्हणजे 50,000 रुपये कॅश डिस्काउंट, 50,000 रुपये कॉर्पोरेट बोनस आणि 25,000 रुपये एक्सचेंज सपोर्ट मिळत आहे. तसेच Prestige AT व्हेरियंटवर तब्बल 1.40 lakh रुपयांपर्यंतची जबरदस्त ऑफर आहे.
  • नवीन स्टॉक: Slavia च्या नवीन व्हेरियंट्सवर हा फायदा थोडा कमी असून तो कारच्या मॉडेलनुसार 50,000 रुपये ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

3. Skoda Kylaq: एकूण फायदा ७५,००० रुपयांपर्यंत

  • जुना स्टॉक: नुकत्याच लाँच झालेल्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या Signature आणि Signature+ या जुन्या ट्रिम्सवर 50,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपये कॉर्पोरेट बोनस आणि 15,000 रुपये एक्सचेंज सपोर्ट दिला जात आहे.
  • नवीन स्टॉक: नवीन मॉडेल्सवर बहुतांश व्हेरियंट्ससाठी 25,000 रुपयांचे एक्सचेंज आणि लॉयल्टी ऑफर्स मिळतील. तर Signature MT आणि AT ट्रिम्सवर अतिरिक्त 10,000 रुपयांची रोख सूट दिली जाईल.

4. Skoda Kodiaq: सर्वाधिक ३.५० लाखांची सूट

  • नवीन स्टॉक: Kodiaq च्या नवीन मॉडेलमधील Selection L&K ट्रिमवर 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या संयुक्त ऑफर्स आहेत, तर Sportline व्हेरियंटवर कॉर्पोरेट आणि एक्सचेंजच्या माध्यमातून 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.
  • जुना स्टॉक: Skoda च्या या फ्लॅगशिप प्रीमियम एसयूव्हीवर या महिन्यात सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. या कारच्या Sportline आणि Selection L&K या जुन्या मॉडेल्सवर थेट 2 लाख रुपये कॅश डिस्काउंट, 1 लाख रुपये कॉर्पोरेट बेनिफिट आणि 50,000 रुपये एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच एकूण 3.50 लाख रुपयांची बंपर बचत होणार आहे.

हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या