Smart TV Discount Offers: चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा खरा आनंद मोठ्या स्क्रीनवरच मिळतो, म्हणूनच आजकाल प्रत्येक घरामध्ये अद्ययावत फीचर्स असलेला स्मार्ट टीव्ही असणे एक गरज बनली आहे. अनेक ग्राहक आपल्या घरासाठी ब्रँडेड आणि मोठ्या डिस्प्लेचा टीव्ही खरेदी करण्याची इच्छा बाळगून असतात. मात्र, बाजारातील गगनाला भिडणाऱ्या किमती पाहून अनेकदा हा बेत रद्द करावा लागतो.
ग्राहकांची हीच अडचण ओळखून सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर काही आघाडीच्या ब्रँड्सवर तब्बल अर्ध्या किमतीपर्यंतची घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ किंमत कमी झाली नसून, अतिरिक्त बँक सवलती आणि एक्सचेंज बोनसचा फायदाही दिला जात आहे. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये धमाकेदार टीव्ही शोधत असाल, तर खालील ३ बेस्ट डील्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.
फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या ३ सर्वोत्तम टीव्ही डील्सचा सविस्तर तपशील:
शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सध्या ग्राहकांच्या पसंतीस पडणारे ३ मोठे ब्रँड्स आणि त्यांच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:
१. LG Nano 4K UHD TV (किंमत: ३४,९९९ रुपये)
एलजीचा हा स्मार्ट टीव्ही त्याच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल २४ टक्के सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये ब्रँडेड टीव्ही शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
- किंमतीतील बदल: यामुळे या टीव्हीची किंमत ४५,९९० रुपयांवरून थेट ३४,९९९ रुपयांवर आली आहे.
- बँक आणि एक्सचेंज ऑफर: खरेदी दरम्यान एचडीएफसी (HDFC) बँकेचे कार्ड वापरल्यास ५,७५० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज करून ४,३१० रुपयांची आणखी बचत करता येईल.
- खास फीचर्स: ४३ इंचाचा मोठा डिस्प्ले असलेल्या या टीव्हीमध्ये HDR10 आणि ४K इमेज अपस्केलिंग सारखे फीचर्स आहेत. दमदार परफॉर्मन्ससाठी यात अल्फा ७ एआय (AI) प्रोसेसर आणि उत्कृष्ट आवाजासाठी डॉल्बी अॅटमॉसची साऊंड सिस्टीम मिळते.
२. TCL QLED 4K T6D TV (किंमत: ४१,९९० रुपये)
या संपूर्ण यादीमध्ये सर्वात फायदेशीर आणि मोठी डील या मॉडेलवर मिळत आहे. हा टीव्ही त्याच्या मूळ किमतीवर थेट ४५ त्या भारी सवलतीसह उपलब्ध आहे.
- किंमतीतील बदल: या टीव्हीची मूळ किंमत ७६,९९० रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर थेट ४१,९९० रुपयांवर आली आहे.
- बँक आणि एक्सचेंज ऑफर: फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरल्यास २,८५० रुपयांची अतिरिक्त बचत होईल. तसेच जुना टीव्ही बदलून तब्बल १४,६९० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
- खास फीचर्स: ५५ इंचाचा हा टीव्ही क्युएलईडी (QLED) डिस्प्लेसह येतो. यात डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस यांसारख्या प्रीमियम ध्वनी प्रणाली आहेत. चांगल्या क्लॅरिटीसाठी यात एचव्हीए (HVA) पॅनेल आणि डायनॅमिक कलर एनहान्समेंट देण्यात आले आहे.
३. Samsung Mini LED TV (किंमत: ४५,९९० रुपये)
- सॅमसंगच्या ५५ इंचाच्या या मोठ्या स्मार्ट टीव्हीवर सध्या फ्लिपकार्टवर मोठी सूट दिली जात आहे. उत्कृष्ट पिक्चर क्वालिटीसाठी हा टीव्ही ओळखला जातो.
- खास फीचर्स: या टीव्हीमध्ये सॅमसंग व्हिजन एआयचा सपोर्ट असून अडॅप्टिव्ह साउंड हे मुख्य वैशिष्ट्य आहे. चांगल्या पिक्चर क्वालिटीसाठी यात मिनी एलईडी प्रोसेसर दिला आहे. हा टीव्ही २ एनर्जी स्टार रेटिंग आणि ५०Hz रिफ्रेश रेटसह येतो.
- किंमतीतील बदल: या टीव्हीची किंमत ५९,९९९ रुपयांवरून कमी होऊन आता ४५,९९० रुपये झाली आहे.
- बँक आणि एक्सचेंज ऑफर: एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून खरेदी केल्यास ७,०५० रुपयांपर्यंतची थेट सूट मिळू शकते. जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास १४,६९० रुपयांपर्यंतची आणखी बचत करणे शक्य आहे.










