Home / महाराष्ट्र / Amravati Crime : मित्राच्याच रूमवर मुलींना न्यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा; अमरावतीतील ‘व्हिडीओ कांड’ने शहर हादरलं…

Amravati Crime : मित्राच्याच रूमवर मुलींना न्यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा; अमरावतीतील ‘व्हिडीओ कांड’ने शहर हादरलं…

Amravati Crime : परतवाडा शहरात सोशल मीडियाद्वारे तरुणींचे आक्षेपार्ह चित्रीकरण आणि छायाचित्रे प्रसारित झाल्याच्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले...

By: Team Navakal
Amravati Crime
Social + WhatsApp CTA

Amravati Crime : परतवाडा शहरात सोशल मीडियाद्वारे तरुणींचे आक्षेपार्ह चित्रीकरण आणि छायाचित्रे प्रसारित झाल्याच्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. केवळ तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा वाटणाऱ्या या प्रकरणात आता लैंगिक शोषणाचे दाहक वास्तव समोर आले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली असून, या प्रकरणात अमरावती शहरातील एका भाड्याच्या खोलीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

गुन्ह्याची कार्यपद्धती आणि ‘रूम’ कनेक्शन-
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राच्या माध्यमातून एका खोलीची व्यवस्था केली होती. हा मित्र काही तासांच्या कालावधीसाठी अयानला ही खोली भाड्याने उपलब्ध करून देत असे. तिथेच अयानने दोन पीडित मुलींवर अत्याचार केले. पोलिसांनी या कृत्यात सहकार्य करणाऱ्या आणि जागा उपलब्ध करून देणाऱ्या त्या मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप पीडित मुली घाबरल्यामुळे समोर आल्या नसल्या, तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अत्याचाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

अटकेतील आरोपींची साखळी आणि विस्तार-
१६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्हिडिओ चित्रित करणारे, ते साठवणारे आणि प्रसारित करणाऱ्यांचा समावेश आहे:

अयान अहमद तनवीर अहमद (१९): मुख्य आरोपी, ज्याने अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.

उजेरखान इकबाल खान (२०): आक्षेपार्ह व्हिडिओ डाऊनलोड करून ते प्रसारित करण्यात सक्रिय होता.

मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२): व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांतून व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप.

तरबेज खान तसलिम खान (२४): व्हिडिओच्या प्रसारात आणि साखळी निर्मितीत सहभागी.

याव्यतिरिक्त, अयानच्या मित्रांनीही हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून मुलींच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

४५ सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) तैनात-
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने ४५ सदस्यीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. आरोपींच्या मोबाईलवरून एकूण १८ व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यासाठी हे पथक रात्रंदिवस काम करत आहे. या प्रकरणातील पीडितांची ओळख पटवून त्यांना कायदेशीर संरक्षण आणि न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सामाजिक खळबळ आणि पोलीस कारवाई-
या घटनेमुळे जिल्हाभरात संतापाची लाट असून, आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी अद्याप काही संशयितांची चौकशी सुरू ठेवली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या