Home / महाराष्ट्र / Building Collapses : मदतीसाठी आर्त हाका, मातीखाली जीवासाठी सुरू झुंज- मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्ब्ल ९ जण अडकलेलेच?

Building Collapses : मदतीसाठी आर्त हाका, मातीखाली जीवासाठी सुरू झुंज- मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्ब्ल ९ जण अडकलेलेच?

Building Collapses : पुण्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी परिसरात कचऱ्याचा अवाढव्य डोंगर खचून लगतच्या इमारतीवर कोसळल्याची एक अत्यंत थरारक आणि...

By: Team Navakal
Building Collapses :
Social + WhatsApp CTA

Building Collapses : पुण्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत येणाऱ्या मोशी परिसरात कचऱ्याचा अवाढव्य डोंगर खचून लगतच्या इमारतीवर कोसळल्याची एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. या भीषण आपत्तीत इमारतीमधील अंदाजे २३ नागरिक मलब्याखाली गाडले गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून लष्कर (Indian Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गेल्या ३0 ते ३५ तासांपासून जीवाची बाजी लावून हे अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक बचावकार्य राबवले जात आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असून, अद्यापही काही नागरिक मलब्याखाली मृत्यूशी झुंज देत आहेत.

३५ तासांत ६०० मिमी विक्रमी पाऊस; कचऱ्याचा डोंगर खचला
या संपूर्ण घटनेची माहिती देताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची डोळ्यात पाणी आणणारी भीषण परिस्थिती विशद केली. महाजन म्हणाले की, “ही अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. मोशी आणि मावळ परिसरामध्ये गेल्या ३० ते ३५ तासांत तब्बल ६०० मिलीमीटर इतका ढगफुटीसदृश रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह निर्माण झाला आणि वर्षानुवर्षे साचलेला ओला-सुका कचरा व चिखलाचा संपूर्ण डोंगर वाहून थेट रहिवासी इमारतीवर कोसळला.” या अचानक झालेल्या आघातामुळे इमारतीमधील रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

“ढिगाऱ्याखालून ३ ते ४ जण बोलतायत”; मलब्यातून चहा-बिस्किटांचा पुरवठा
बचावकार्यातील आव्हानांवर बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अजूनही जवळपास १२ जण अडकल्याची भीती आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या मलब्याखालून ३ ते ४ जणांचे आवाज येत असून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले आहे. मात्र, वर कचऱ्याचा आणि चिखलाचा प्रचंड थर साचलेला असल्यामुळे बचाव पथकाला थेट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अडकलेल्या काही जणांचे पाय जड सिमेंटच्या खांबांखाली आणि मलब्यात अडकले आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने ओढून बाहेर काढणे अशक्य आहे. अशाही परिस्थितीत, मलब्यातील छोट्या फटींमधून त्या नागरिकांना चहा आणि बिस्किटे पोहोचवून त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत.

लष्कर आणि एनडीआरएफचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
हा संपूर्ण परिसर कचरा, चिखल आणि कोसळलेल्या इमारतीचे लोखंडी खांब यांमुळे अत्यंत दलदलीचा आणि धोकादायक बनला आहे. मोठी यंत्रसामग्री किंवा जेसीबी वापरल्यास ढिगाऱ्याखालील मानवी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक अतिशय काळजीपूर्वक व हाताने मलबा बाजूला करण्याचे काम करत आहेत. “थोड्या वेळापूर्वीच आणखी काही जणांना वाचवण्यात यश आले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवटच्या व्यक्तीला बाहेर काढेपर्यंत हे ऑपरेशन अखंडपणे सुरू राहील,” असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

“वेळ लागला तरी चालेल, पण प्रत्येक जीव वाचला पाहिजे” – सरकारची भूमिका
राज्य शासनाने या दुर्घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पातळीवरून या बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, “आमच्यासाठी सध्या मलब्यात अडकलेल्या प्रत्येक नागरिकाचा जीव अमूल्य आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या