Home / महाराष्ट्र / Lohagad Death Case : लोहगड प्रकरणात नव वळण; सिया आणि चेतनला पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही-सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय..

Lohagad Death Case : लोहगड प्रकरणात नव वळण; सिया आणि चेतनला पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही-सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय..

Lohagad Death Case : लोहगडावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल या तरुणाची हत्या केल्याच्या थरारक प्रकरणात वडगाव सत्र न्यायालयाने आज मोठा...

By: Team Navakal
Lohagad Death Case
Social + WhatsApp CTA

Lohagad Death Case : लोहगडावरून दरीत ढकलून केतन अग्रवाल या तरुणाची हत्या केल्याच्या थरारक प्रकरणात वडगाव सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत (Magisterial Custody) रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता या दोन्ही मुख्य आरोपींना जामिनासाठी रीतसर अर्ज करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या हत्येच्या कटात आता एका तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले असून, या प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

हत्याकांडाच्या कटात बीडच्या वर्गमित्राची एन्ट्री; बनणार ‘माफीचा साक्षीदार’?
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासादरम्यान नव्या कड्या जोडल्या आहेत. केतनच्या हत्येच्या या पूर्वपरियोजित कटात मुख्य आरोपी चेतन चौधरीचा एक महाविद्यालयीन वर्गमित्र सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो पुण्याच्या बालेवाडी येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

तपासात उघड झाले की, हा तरुण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतनच्या सतत संपर्कात होता. चेतन आणि सियाने केतनला कायमचे वाटेतून कसे बाजूला करायचे, या संपूर्ण खूनी कटाची सविस्तर चर्चा या मित्रासोबत केली होती. इतकेच नव्हे, तर १८ जून रोजी कृत्य करण्यासाठी लोहगडावर सोबत येण्याचा आग्रहही त्यांनी या मित्राकडे केला होता. मात्र, या तरुणाने सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि ‘असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलून कृत्य करू नका’ असा सल्लाही या दोघांना दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर चेतनने सर्वात आधी याच मित्राची भेट घेतली होती आणि त्यानंतर सियानेही त्याच्याशी संपर्क साधला होता. पोलीस सध्या त्यांचे डिजिटल चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासत असून, या तरुणाला गुन्ह्यात ‘माफीचा साक्षीदार’ करण्याची कायदेशीर शक्यता पोलीस चाचपडून पाहत आहेत.

कोड वर्ड आणि लुल्लानगरमधील ‘रिहर्सल’
आजच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात अनेक धक्कादायक बाबी मांडल्या. पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयलचा दुसरा लपवून ठेवलेला मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलच्या तांत्रिक तपासणीत (Digital Forensic) असे आढळून आले की, सिया आणि चेतन हे एकमेकांशी अत्यंत गुप्त अशा सांकेतिक (कोड वर्ड) भाषेत संवाद साधत होते.

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात संशय व्यक्त केला की, घटनेच्या दिवशी लोहगडावर सिया ‘बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने’ अचानक खाली वाकली; हाच चेतनसाठी पूर्वठरलेला संकेत (सिग्नल) होता. सिया खाली वाकताच चेतनने केतनला गाफील ठेवून थेट दरीत ढकलून दिले. या गुन्ह्याची भीषणता इतकी होती की, लोहगडावर जाण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका ठिकाणी केतनला सोबत घेऊन या संपूर्ण कृत्याची ‘रिहर्सल’ (तालीम) केली होती. पोलिसांनी सियाला लुल्लानगर येथे नेऊन त्या घटनास्थळाची अधिकृत पडताळणी (Spot Verification) केली आहे. तसेच, घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडे जप्त करून रासायनिक विश्लेषणासाठी (Forensic Lab) पाठवण्यात आले आहेत.

न्यायालयीन युक्तिवाद आणि कोर्टाचा निर्णय
तपास अधिकारी मनोज पवार यांनी न्यायालयात सांगितले की, चौकशीदरम्यान चेतनकडून गुन्ह्याच्या घटनाक्रमाची सखोल माहिती घेण्यात आली आहे, तर सियाकडून तिच्या पासपोर्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या कागदपत्रांबाबत चौकशी करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींची पोलीस कोठडी आणखी ३ दिवसांनी वाढवून मिळावी. यासोबतच पोलिसांनी दोन्ही आरोपींची पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर) चाचणी करण्याची परवानगी मागितली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही न्यायवैद्यकीय चाचणीसाठी आरोपींची लेखी संमती आवश्यक असते. त्यावर सरकारी वकिलांनीही तूर्तास अशा चाचणीची तातडीची गरज नसल्याचे सांगितले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या