Home / महाराष्ट्र / Lohagad Murder Case : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याकांड: १ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक, पासपोर्टची चोरी अन् हत्येचा संपूर्ण घटनाक्रम; तपासात अनेक धक्कादायक खुलासे

Lohagad Murder Case : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याकांड: १ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक, पासपोर्टची चोरी अन् हत्येचा संपूर्ण घटनाक्रम; तपासात अनेक धक्कादायक खुलासे

Lohagad Murder Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाचा (Ketan Agarwal Murder Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या...

By: Team Navakal
Lohagad Murder Case
Social + WhatsApp CTA

Lohagad Murder Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाचा (Ketan Agarwal Murder Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या गुन्ह्यातील अनेक धक्कादायक आणि थरारक पैलू समोर येत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ लग्न टाळण्यासाठीच नव्हे, तर मोठ्या आर्थिक फायद्यासाठी हा क्रूर कट रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आता १ कोटी रुपयांची फसवणूक, गुगलवरील संशयास्पद शोध आणि हत्येचा ‘प्लान बी’ यांसारख्या गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने १ कोटी रुपयांची फसवणूक
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल हिने लग्नाच्या खरेदीच्या (वेडिंग शॉपिंग) नावाखाली होणारा पती केतन अग्रवाल याच्याकडून तब्बल १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, तिने या पैशातून कोणतीही खरेदी न करता, ही अवाढव्य रक्कम गुपचूप तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली होती. यावरून हा गुन्हा केवळ मानसिक अस्वस्थतेतून नव्हे, तर पूर्वनियोजित आर्थिक फसवणुकीच्या हेतूने केल्याचे स्पष्ट होत आहे.

कॅब चालकाची साक्ष आणि पासपोर्ट चोरीचे गूढ
६ जून रोजी केतन आणि सिया यांना ‘प्री-वेडिंग ट्रिप’साठी मुंबई विमानतळावर सोडणाऱ्या वैभव जाधव या कॅब चालकाचा अत्यंत महत्त्वाचा जबाब समोर आया आहे. वैभवने सांगितले की, सियाला बाली येथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिचा भाऊ साहिल याने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले होते. पुण्यापासून ते पिंपरी-चिंचवडमधील रावेतापर्यंतच्या प्रवासात या बहीण-भावामध्ये तीव्र वाद सुरू होता.

प्रवासादरम्यान एका ठिकाणी गाडी थांबवण्यात आली, तेव्हा सिया गाडीतून उतरून मागे गेली आणि तिने काही वस्तू कॅबच्या डिक्कीमध्ये लपवून ठेवल्या. विमानतळावर सर्वांना सोडल्यानंतर वैभवला फोन आला की गाडीतच कोणाचा तरी पासपोर्ट राहिला आहे. आता पोलीस तपासात हे स्पष्ट झाले आहे की, बाली दौरा रद्द व्हावा म्हणून सियानेच तो पासपोर्ट चोरून डिक्कीत लपवला होता.

टोल आणि सीसीटीव्ही टाळण्यासाठी ९० किमी स्कूटरचा प्रवास
आरोपी चेतन चौधरी याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत हुशारीने पावले उचलली होती. तो पुणे येथून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगड किल्ल्यापर्यंत स्वतःच्या कारऐवजी स्कूटरने पोहोचला, जेणेकरून महामार्गावरील टोल नाक्यांवर (टोल प्लाझा) कारची किंवा फास्टॅगची नोंद होऊ नये. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ही स्कूटर जप्त केली आहे.

किल्ल्यावर चढताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेतनने डोक्यावर हुडी घातली होती. कड्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने हुडी काढून काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये केतनवर पाळत ठेवली. हत्येनंतर पळून जाताना त्याने पुन्हा हुडी परिधान केली आणि त्याच स्कूटरने तो पुण्यात परतला.

गुगलवर शोधला ‘डेथ पॉइंट’ आणि ‘विष देण्याचा मार्ग’
सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत दोन्ही आरोपींच्या मोबाईल सर्च हिस्ट्रीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन यांनी गुगलवर लोहगड किल्ल्यावरील ‘डेथ पॉइंट’ (खोल दऱ्या) शोधले होते. तसेच, त्यांनी गुगलवर ‘डेथ पॉइंट आणि विष देऊन कसे मारावे, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही’ अशा स्वरूपाचे संशयास्पद प्रश्न शोधले होते. जर दरीतून ढकलण्याचा बेत फसला, तर केतनला संपवण्यासाठी त्यांनी रस्ते अपघाताचा ‘प्लॅन बी’ देखील तयार ठेवला होता.

हत्येच्या तारखांचा संपूर्ण घटनाक्रम: ३१ मे ते १८ जून
३१ मे (कटाची सुरुवात): ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्यानंतर केतन वारंवार सियाला भेटत असे. केतनला ट्रेकिंगची (डोंगर चढण्याची) आवड असल्याने त्याने सियाला लोहगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले. याच वेळी सियाच्या डोक्यात केतनला कड्यावरून ढकलून देण्याचा कट शिजला.

५ जून (बाली दौरा रद्द करण्याचा प्रयत्न): सियाने केतनकडे लोहगडला जाण्याचा हट्ट केला, पण केतनने नकार दिला. अखेर ६ जूनच्या बाली दौऱ्यात एकत्र राहावे लागेल या भीतीने तिने कॅबमध्येच केतनचा पासपोर्ट चोरून लपवला, ज्यामुळे हा दौरा रद्द झाला.

१४ जून (पहिला जीवघेणा प्रयत्न): सियाने पुन्हा हट्ट करून केतनला लोहगडवर नेले. तिथे तिने केतनला दरीत ढकलले, मात्र एका झाडाचा आधार मिळाल्याने केतन बालंबाल वाचला. त्याने विचारणा केली असता, ‘तिथे साप होता आणि तुला वाचवण्यासाठी धक्का दिला,’ अशी थाप सियाने मारली.

१८ जून (तिसऱ्या प्रयत्नात हत्या): १९ जून रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथे आलिशान रिसॉर्ट बुक केले होते. तो मुक्काम टाळण्यासाठी सियाने प्री-वेडिंग फोटोशूटचे कारण सांगून केतनला पुन्हा लोहगडच्या कड्यावर नेले. केतन दरीकडे पाहत असताना सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला मागून जोरात धक्का दिला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या