Mumbai Cricket Election – मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादावर आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरील निर्बंध जैसे थे ठेवले. उद्या पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
एमसीएच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अंतिम यादीवर आक्षेप घेत एमसीएचे जुने सदस्य श्रीपदा हळबे (MCA member Shripada Halbe)आणि अन्य काही सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.२४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या यादीवर हळबे आणि इतरांनी हरकती नोंदवत काही सूचना केल्या होत्या. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. त्यामळे याचिकार्त्यांनी (Petitioners)सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून हरकती का फेटाळल्या याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मुख्य मागणी याचिकेद्वारे केली आहे.
या याचिकेवर मंगळवारी झालेल्या प्राथमिक सुनावणीत तूर्त पात्र उमेदवारांची यादी जाहीर करू नका,असे अंतरिम आदेश देत न्यायालयाने सुनावणी आज गुरुवारी घेण्याचे निश्चित केले होते.त्यानुसार आज सुनावणी झाली . सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी न्यायालयात माहिती दिली की, त्यांचे आक्षेप का फेटाळण्यात आले याचे सविस्तर स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांकडून आत्ताच प्राप्त झाले आहे. त्याचा अभ्यास करून याचिकेत आवश्यक ते फेरबदल करण्याची संधी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने आपले यादी प्रसिध्द करण्यावरील स्थगितीचे आदेश कायम ठेवले. उद्या याचिकावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
हे देखील वाचा –
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता
देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली
नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले









