Home / महाराष्ट्र / Nida Khan : नाशिक टीसीएस केस: निदा खानच्या अटकेनंतर पोलिसांचं मोठं पाऊल; प्रेग्नन्सी टेस्टचा रिपोर्ट अखेर समोर!

Nida Khan : नाशिक टीसीएस केस: निदा खानच्या अटकेनंतर पोलिसांचं मोठं पाऊल; प्रेग्नन्सी टेस्टचा रिपोर्ट अखेर समोर!

Nida Khan : नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार...

By: Team Navakal
Nida Khan :
Social + WhatsApp CTA

Nida Khan : नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिच्या ४० दिवसांच्या लपाछपीचा अखेर शेवट झाला आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका धाडसी मोहिमेत निदाला ताब्यात घेण्यात आले. या अटकेनंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले असून, या माहितीमुळे प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.

वैद्यकीय चाचणीत गरोदरपण स्पष्ट-
फरार असताना निदा खानने मुंब्रा येथील डॉक्टरांशी संपर्कात राहून उपचारांसाठी मदत घेतल्याची चर्चा होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची यूपीटी (Urine Pregnancy Test) करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला असून ती दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तिने स्वतः गरोदर असल्याचे सांगत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते, मात्र न्यायालयाने हे प्रकरण एका मोठ्या ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’चा भाग असल्याचे मानून तिचा जामीन फेटाळला होता.

अटकेसाठी निवडले होते निर्जन ठिकाण-
निदा खानने पोलिसांपासून वाचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनीची निवड केली होती. तिने ज्या इमारतीत आश्रय घेतला होता, तिच्या आसपास दूरवर कोणतीही वस्ती नव्हती. वर्दळ नसलेल्या या निर्जन भागात पोलिसांची नजर पडणार नाही, असा तिचा कयास होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) तिचे अचूक लोकेशन शोधून काढले. सलग दोन दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांनी खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदाला बेड्या ठोकल्या.

मदतीचे जाळे आणि राजकीय कनेक्शन
निदा खान एकटी नसून तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी हेदेखील तिच्यासोबत लपले होते. सध्या पोलीस निदाच्या कुटुंबीयांचीही कसून चौकशी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निदाला पळून जाण्यासाठी आणि लपण्यासाठी कोणी कोणी आर्थिक व लॉजिस्टिक मदत केली, याचा तपास आता एसआयटी करत आहे.

इतर आरोपींच्या चौकशीला वेग
याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. पीडितेला गुंगीकारक पदार्थ देण्याचा स्रोत काय होता? या धर्मांतर प्रकरणाला नेमके ‘फंडिंग’ कोठून होत होते? आणि आरोपींच्या बँक व्यवहारांमध्ये संशयास्पद व्यवहार झाले आहेत का? या दिशेने मुंबई नाका पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या