Citroen Aircross Comfort Edition: फ्रेंच कार निर्माता कंपनी सिट्रोएनने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘एअरक्रॉस’ चे एक नवीन लिमिटेड-एडिशन मॉडेल सादर केले आहे. ‘सिट्रोएन एअरक्रॉस कम्फर्ट एडिशन’ असे या नवीन कारचे नाव असून, कंपनीने ही कार 3 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 9.09 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे बजेट सेगमेंटमध्ये ही कार ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
या कारच्या इंटिरिअरमध्ये कंपनीने मोठे आणि आकर्षक बदल केले आहेत. यामध्ये मेट्रोपॉलिटन बेज लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, सिल्व्हर फिनिशिंगसह ब्लॅक ग्रेन्ड ट्रिम आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी अॅडजस्टेबल फ्रंट आणि रिअर हेडरेस्ट देण्यात आले आहेत, जे प्रवासाचा आनंद अधिक वाढवतील.
गाडीच्या व्हेरियंट्सनुसार एक्स-शोरूम किमती:
कंपनीने ही कम्फर्ट एडिशन मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) मध्ये आणली असून, त्याच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:
- सिट्रोएन एअरक्रॉस You MT: 9,09,000 रुपये
- सिट्रोएन एअरक्रॉस Plus MT: 9,99,000 रुपये
- सिट्रोएन एअरक्रॉस Plus Turbo 7S MT: 11,99,000 रुपये
कारसाठी ३ भन्नाट अॅक्सेसरीज पॅक्स; सुरक्षेसाठी मिळणार डॅशकॅम
या नवीन एडिशनसोबत कंपनीने ग्राहकांसाठी ‘यू’, ‘प्लस’ आणि ‘मॅक्स’ असे 3 अवेलेबल अॅक्सेसरीज पॅक्स देखील सादर केले आहेत, जे ग्राहकांना स्वतंत्रपणे खरेदी करता येतील:
३. मॅक्स पॅक (किंमत ४०,००० रुपये): हा सर्वात प्रगत पॅक आहे. यामध्ये अॅम्प्लीफायरसह जेबीएल कंपनीचे प्रीमियम स्पीकर्स मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात प्रगत सुरक्षेसाठी फ्रंट आणि रिअर डॅशकॅम दिला आहे. हा कॅमेरा अपघात टाळण्यासाठी पुढची गाडी जवळ आल्यास, लेन बदलल्यास, किंवा वाटेत पादचारी आल्यास ऑडिओ अलर्टद्वारे चालकाला आधीच सावध करतो.
१. यू पॅक (किंमत ३६,६०० रुपये): या पॅकमध्ये ग्राहकांना अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी 10 इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळते. याशिवाय रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, फॉग लॅम्प, क्रोम इन्सर्टसह डोअर क्लॅडिंग आणि फुल व्हील कव्हर्स मिळतात.
२. प्लस पॅक (किंमत ८,४६० रुपये): हा एक बजेट पॅक असून, यामध्ये रिव्हर्स कॅमेरा, वायरलेस चार्जर, क्रोम इन्सर्टसह डोअर क्लॅडिंग आणि गाडीचा लूक वाढवण्यासाठी काही स्टाईलिश एलिमेंट्स दिले आहेत.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित










