Home / arthmitra / Elon Musk Trillionaire: इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; संपत्तीचा आकडा पाहून बडे बडे उद्योगपतीही चक्रावले

Elon Musk Trillionaire: इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; संपत्तीचा आकडा पाहून बडे बडे उद्योगपतीही चक्रावले

Elon Musk Trillionaire: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इलॉन मस्क यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला...

By: Team Navakal
Elon Musk Trillionaire: इलॉन मस्क बनले जगातील पहिले 'ट्रिलियनेअर'; संपत्तीचा आकडा पाहून बडे बडे उद्योगपतीही चक्रावले
Social + WhatsApp CTA

Elon Musk Trillionaire: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इलॉन मस्क यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मस्क हे अधिकृतपणे जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ म्हणजेच १ लाख कोटी डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या ‘स्पेसएक्स’ या रॉकेट कंपनीचे शेअर्स पहिल्यांदाच शेअर बाजारात आले. पहिल्याच दिवशी या शेअर्सनी ११ टक्क्यांची उसळी घेत कमालीचा विक्रम केला.

स्पेसएक्सच्या शेअरची किंमत बाजारात येताच 135 डॉलर्सवरून थेट 150 डॉलर्सवर पोहोचली आणि नंतर ती 172 डॉलर्सच्या आसपास स्थिरावली. या ऐतिहासिक वाढीमुळे स्पेसएक्स या एकाच कंपनीचे एकूण बाजार मूल्य थेट 2.18 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.

मस्क यांच्या अफाट संपत्तीचे गुपित

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना जानेवारी 2021 मध्ये मागे टाकत मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. तेव्हा टेस्लाच्या शेअर्समधील वाढीमुळे त्यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर्सच्या पार गेली होती. आता ट्रिलियनेअर बनल्यानंतर त्यांच्या संपत्तीत खालील कंपन्यांचा मोठा वाटा आहे:

  • स्पेसएक्स आणि टेस्ला: मस्क यांच्या संपत्तीचा मुख्य हिस्सा त्यांच्या मालकीच्या या दोन सर्वात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समधून येतो.
  • इतर प्रगत कंपन्या: याशिवाय मानवी मेंदूमध्ये चिप बसवणारी ‘न्यूरालिंक’ ही न्यूरोटेक्नोलॉजी कंपनी आणि भुयारी बोगदे तयार करणारी ‘द बोअरिंग कंपनी’ या उपक्रमांमध्येही त्यांची मोठी भागीदारी आहे.

कंपनी शेअर बाजारात आणण्यामागचा मोठा हेतू

स्पेसएक्स ही खाजगी कंपनी अचानक शेअर बाजारात का आणली, याचे उत्तर स्वतः मस्क यांनी दिले आहे. अंतराळात स्वतःचे सॅटेलाइट आणि डेटा सेंटर्स उभारण्यासाठी तसेच भविष्यात मंगळ ग्रहावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठी कंपनीला अफाट पैशांची गरज आहे.

आपले जीवन बहु-ग्रहीय बनवण्याच्या उद्देशाचा पुनरुच्चार करत मस्क म्हणाले की, स्पेसएक्सला केवळ काही अंतराळवीरांनाच नव्हे, तर तुमच्यासारख्या सामान्य नागरिकांनाही चंद्रावर, मंगळावर आणि त्यापलीकडे घेऊन जायचे आहे. मंगळावर 10 लाख लोकांची वस्ती उभारणे, अंतराळात फुटबॉलच्या मैदानाएवढे मोठे डेटा सेंटर्स सुरू करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या शर्यतीत ओपनएआय सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

या मोठ्या योजनांसाठी अब्जावधी डॉलर्सची गरज आहे. कारण कंपनीला व्यावसायिक नफा मिळत असला, तरी 2025 च्या सुरुवातीपासून ते 31 मार्च 2026 या कालावधीत कंपनीला 8.7 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे.

पैसा आणि नोकरीचे महत्त्व संपणार? मस्क यांचे भाकीत

गेल्या वर्षी इलॉन मस्क यांनी भविष्यातील जगाबद्दल एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे विधान केले होते. त्यांच्या मते, आगामी काळात मानवी चलनाला काहीही महत्त्व राहणार नाही आणि लोकांच्या नोकऱ्या देखील ऐच्छिक असतील.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी रोबोट्स भविष्यात एवढे प्रगत आणि उत्पादनक्षम बनतील की माणसाला पैशांची गरजच भासणार नाही. बहुतांश नोकऱ्यांचे रूपांतर एका छंदात होईल आणि जगातून गरिबी पूर्णपणे नष्ट होईल, असा दावा मस्क यांनी केला आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या