Sharad Pawar : या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने स्थानिक पातळीवर कुणासोबतही युती करा, पण भाजपासोबत नाही, असे स्पष्ट निर्देश पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आज पक्षाच्या महिला आघाडीची बैठक पार पडली असून या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि खासदार फौजिया खान या देखील उपस्थित होत्या.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, स्थानिक परिस्थितीचा विचार करून युती-आघाडीबाबत निर्णय घ्यावा, त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या गोटात यासंदर्भात जोरदार हालचाली सुरु आहेत. याच पार्शवभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे.
विशेष म्हणजे, या बैठकीत केवळ भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही इतर पक्षाचे नाव घेतले नाही, यामुळे भविष्यात अजित पवार गटासोबतही समन्वय किंवा युतीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नवे राजकीय समीकरणं जुळण्याची चिन्हं दिसत आहेत.
हे देखील वाचा – RBI : महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांना आरबीआयने ठोठावला दंड..









