Home / मनोरंजन / Bigg Boss Marathi 6 Winner: तन्वी कोलतेने मारली बाजी! ट्रॉफीसह जिंकली मोठी रक्कम; पाहा बक्षिसांची यादी

Bigg Boss Marathi 6 Winner: तन्वी कोलतेने मारली बाजी! ट्रॉफीसह जिंकली मोठी रक्कम; पाहा बक्षिसांची यादी

Bigg Boss Marathi 6 Winner: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले अत्यंत दिमाखात पार पडला असून, प्रेक्षकांची लाडकी स्पर्धक...

By: Team Navakal
Bigg Boss Marathi 6 Winner
Social + WhatsApp CTA

Bigg Boss Marathi 6 Winner: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले अत्यंत दिमाखात पार पडला असून, प्रेक्षकांची लाडकी स्पर्धक तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली आहे. टॉप-५ मध्ये विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद अशा तगड्या स्पर्धकांना मागे टाकत तन्वीने विजयावर शिक्कामोर्तब केले. या प्रवासात राकेश बापट उपविजेता ठरला.

बक्षिसांचा पाऊस: तन्वीला काय काय मिळाले?

तन्वीने केवळ विजेतेपदच मिळवले नाही, तर तिने आपल्या झोळीत मोठ्या बक्षिसांची कमाई केली आहे. विजेती ठरल्यानंतर तन्वीवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला:

  • रोख रक्कम: ‘बिग बॉस मराठी’च्या वतीने तन्वीला 15 लाख रुपयांचा धनादेश (Check) बक्षीस म्हणून देण्यात आला.
  • खरेदी व्हाउचर: पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून तन्वीला 10 लाख रुपयांचे विशेष व्हाउचर मिळाले आहे.
  • ई-बाईक: प्रवासासाठी तिला तुनवाल ई-मोटर्सकडून एक शानदार ई-बाईक भेट देण्यात आली.
  • खास आठवण: रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची एक अतिशय सुंदर फ्रेम तन्वीला भेट दिली.
  • मानाची ट्रॉफी: या सर्वांसोबतच ‘बिग बॉस मराठी ६’ ची लखलखती मानाची ट्रॉफी आता तन्वीच्या घरी दिमाखात सजणार आहे.

“तन्वी कोलते आता एक ब्रँड”

विजयाचा आनंद व्यक्त करताना तन्वी भावूक झाली होती. ती म्हणाली, “मी या घरात तन्वी कोलते म्हणून आले होते, पण आज बाहेर पडताना ‘तन्वी कोलते’ हा एक ब्रँड घेऊन जात आहे. मालिकांच्या पलीकडे जाऊन माझी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ माझ्यासाठी स्वप्नपूर्ती ठरले आहे.”

कोकणची ही मुलगी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिद्ध होतीच, पण आता ‘बिग बॉस’च्या विजयाने तिला महाराष्ट्राच्या घराघरात एक नवी ओळख मिळवून दिली आहे. सुरुवातीला ‘खूप बोलते’ म्हणून हिणवली गेलेली तन्वी, आता आपल्या कर्तृत्वाने ‘सबको कोलते’ म्हणत विजेती ठरली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या