Dhurandhar 2 OTT Release: बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगचा अॅक्शन पॅक्ड चित्रपट ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ओटीटी रिलीजमुळे चर्चेत होता. आता या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट भारतात आणि परदेशात दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, ओटीटीवर त्याची एक ‘अनसेंसर्ड’ आवृत्ती पाहायला मिळणार आहे.
Dhurandhar 2 OTT Release: भारतात नेटफ्लिक्स नाही, तर ‘या’ प्लॅटफॉर्मवर दिसणार
आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट १५ मे २०२६ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. मात्र, भारतीय प्रेक्षकांसाठी एक मोठा ट्विस्ट आहे. भारतात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार नसून, त्याचे विशेष हक्क JioHotstar ने विकत घेतले आहेत. याआधीचा भाग नेटफ्लिक्सवर असल्याने चाहत्यांमध्ये गोंधळ होता, मात्र आता जिओ हॉटस्टारने ही मोठी डील फायनल केली आहे.
Dhurandhar 2 OTT Release: थिएटरपेक्षा मोठी आणि जास्त हिंसक आवृत्ती
ओटीटीवर रिलीज होणारा हा चित्रपट थिएटरमधील वर्जनपेक्षा वेगळा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला ‘Raw & Unseen’ असे नाव देण्यात आले आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट ३ तास ४९ मिनिटांचा होता, तर ओटीटीवर तो सुमारे ३ तास ५२ मिनिटांचा असेल. सेन्सॉर बोर्डाने कात्री लावलेले डायलॉग्स, अधिक हिंसा आणि काही वाढीव दृश्ये प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.
Dhurandhar 2 OTT Release: १५० कोटींची ऐतिहासिक डील
भारतीय ओटीटी मार्केटमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील असल्याचे मानले जात आहे. जिओ हॉटस्टारने या चित्रपटाचे हक्क तब्बल १५० कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. मोठ्या चित्रपटांचे ‘अनकट’ व्हर्जन ओटीटीवर आणण्याचा जो ट्रेंड सध्या सुरू आहे, त्यात ‘धुरंधर 2’ एक मोठे उदाहरण ठरणार आहे.
परदेशातील प्रेक्षकांसाठी १५ मे पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग सुरू होईल, तर भारतात चित्रपट जिओ हॉटस्टारवर कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर












