Shah Rukh Khan New Car: बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. शाहरुखच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत, ज्यामध्ये रोल्स रॉयस कलिनन आणि बँटले कॉन्टिनेंटल जीटी सारख्या वाहनांचा समावेश आहे.
मात्र, या सगळ्या गाड्यांमध्ये सध्या शाहरुख खानच्या एका नवीन गाडीची जोरदार चर्चा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या ताफ्यात आता अमेरिकेची सर्वात प्रसिद्ध आणि अवाढव्य ‘कॅडिलॅक एस्केलेड’ (Cadillac Escalade) ही शानदार एसयूव्ही सामील झाली आहे. या अलिशान कारची भारतातील अंदाजे किंमत तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
Shah Rukh Khan New Car: किंग खानसारखीच अवाढव्य उपस्थिती
शाहरुख खानच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच या कॅडिलॅक एस्केलेडचा रस्त्यावरील लूक आणि रुबाब अत्यंत दमदार आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत या गाडीच्या सर्वात महागड्या मॉडेलची किंमत 1.68 लाख डॉलर्स (सुमारे 1.61 कोटी रुपये) आहे.
मात्र, भारतात आयात करताना लागणाऱ्या करांमुळे हिची किंमत 5 कोटी रुपयांच्या घरात जाते. ही कार बाजारपेठेत रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी आणि मर्सिडीज बेंझ जीएलएस सारख्या अत्यंत महागड्या गाड्यांना थेट टक्कर देते. या गाडीची लांबी 5382 मिमी आणि उंची 1948 मिमी आहे, ज्यामुळे ती रस्त्यावरून जाताना सर्वांचे लक्ष वेधून घेते.
Shah Rukh Khan New Car: बुलेटपेक्षाही वेगवान आणि शक्तिशाली इंजिन
या अवाढव्य गाडीला धावण्यासाठी तितकेच शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे:
- या कारमध्ये 6.2 लीटर व्ही8 पेट्रोल इंजिन आहे, जे 420 एचपीची पॉवर आणि 624 एनएमचा टॉर्क निर्माण करते.
- यात 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
- एवढी अवाढव्य असूनही ही कार अवघ्या 6.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
- या कारच्या व्ही (V) व्हेरियंटमध्ये सुपरचार्ज्ड इंजिन मिळते, जे थेट 682 एचपीची अफाट ताकद देते.
Shah Rukh Khan New Car: फायव्ह स्टार हॉटेलसारखे लक्झरीयस फीचर्स
५ कोटी रुपयांच्या या कारमध्ये चालकासाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत आधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे 38 इंचाचा त्रिकोणी वक्राकार ओलेड (OLED) डिस्प्ले दिला आहे. गाण्याच्या शौकिनांसाठी यात तब्बल 36 स्पीकर असलेली एकेजी (AKG) ऑडिओ सिस्टीम बसवण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुखाचा विचार करून यात अॅडॉप्टिव्ह डॅम्पर्ससह एअर सस्पेंशन आणि हायवेवर चालवण्यासाठी सुपर क्रूझ हँड्स-फ्री असिस्टन्स दिलेला आहे. कारमध्ये 6 किंवा 7 लोक आरामात बसू शकतात.
Shah Rukh Khan New Car: हॉलीवूड चित्रपट आणि बड्या खेळाडूंची पसंती
शाहरुख खानने खरेदी केलेली ही कार केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रिय आहे. हॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट ‘द मॅट्रिक्स रीलोडेड’, ‘द हँगोव्हर’, ‘द फेट ऑफ द फ्युरियस’ आणि गाजलेल्या वेब सीरिजमध्ये या कारची झलक पाहायला मिळाली आहे. शाहरुख खानशिवाय जगातील दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, डेव्हिड बेकहॅम आणि हॉलीवूड अभिनेता अॅडम सँडलर यांच्याकडेही ही आलिशान कार आहे.
हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!












