कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने रद्द करून त्याला अटक करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिले. त्यानंतर एटीएसने त्याला पुन्हा एकदा अटक केली.
न्या. एस एस तांबे यांनी या प्रकरणी उभय बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तावडेचा जामीन रद्द केला. पानसरे हत्या प्रकरणी तावडे याची २०१३ मध्ये जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. तर नुकतीच डॉ. दाभोलकर हत्या खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर सरकारने पानसरे हत्या प्रकरणात तावडेचा जामीन रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका पुन्हा कोल्हापूर सत्र न्यायालयाकडे वर्ग केली होती.
या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यात जामीन रद्द करण्यात आला . सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि अॅ़ड. शिवाजीराव राणे यांनी युक्तीवाद केला.
