Home / महाराष्ट्र / Bachchu Kadu Eknath Shinde : ‘प्रहार’ची आता शिवसेनेला साथ! बच्चू कडू यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्धार; २४ तासांतील खलबतांचा तपशील समोर

Bachchu Kadu Eknath Shinde : ‘प्रहार’ची आता शिवसेनेला साथ! बच्चू कडू यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्धार; २४ तासांतील खलबतांचा तपशील समोर

Bachchu Kadu Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कमालीची चुरस निर्माण झाली असून, यातच आता एक मोठी...

By: Team Navakal
Bachchu Kadu Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

Bachchu Kadu Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कमालीची चुरस निर्माण झाली असून, यातच आता एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे संस्थापक आणि आक्रमक लोकनेते बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. “शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हितासाठी मी धनुष्यबाण हाती घेणार आहे,” असे संकेत स्वतः बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या वेगवान घडामोडी आणि मागण्यांवरील सकारात्मक चर्चा यांमुळे हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या २४ तासांत नेमकं काय घडलं?
बच्चू कडू यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत केवळ राजकीय चर्चा झाली नसून, ती प्रामुख्याने धोरणात्मक प्रश्नांवर आधारित होती. माध्यमांनी या प्रवासाबाबत विचारले असता कडू मिश्किलपणे म्हणाले, “खरे तर विधान परिषदेची चर्चा किंवा मला आलेली ऑफर याबद्दल मला स्वतःलाही कल्पना नव्हती. ही सर्व चर्चा प्रसारमाध्यमांनी आणि त्यांच्या सूत्रांनी सुरू केली आणि त्यातूनच या निर्णयापर्यंतचा प्रवास सुकर झाला.”

या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होऊन शिंदेनी त्यास सहमती दर्शवली आहे:

शेतकऱ्यांचे प्रश्न: पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे ‘मनरेगा’ (MGNREGS) अंतर्गत आणण्याची महत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली आहे.

हमीभाव आणि मदत: शेतमालाच्या हमीभावात सुधारणा आणि आदिवासी बांधवांच्या समस्यांवर ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

दिव्यांग मंत्रालय: स्थापन झालेल्या दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण करणे आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतील विधवा भगिनींच्या प्रश्नांना प्राधान्य देणे.

‘शिवसेनेतून सुरुवात आणि शेवटही तिथेच’
बच्चू कडू यांनी यावेळी आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. “माझा राजकीय जन्म शिवसेनेतूनच झाला होता आणि आयुष्याचा शेवटही शिवसेनेतच व्हावा, अशी माझी इच्छा आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संघटना चालवणे सध्याच्या काळात कठीण असल्याचे मान्य करत, सत्तेसाठी किंवा पदासाठी आपण हा निर्णय घेत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “मला पद हवे असते तर मी गुवाहाटीला गेलो होतो तेव्हाच मागितले असते, पण मी केवळ दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रहार’ सामाजिक संघटना कायम राहणार
राजकीय प्रवेशाचा निर्णय घेत असतानाच बच्चू कडू यांनी आपल्या ‘प्रहार’ संघटनेच्या भविष्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ‘प्रहार सामाजिक संघटना’ आणि ‘प्रहार दिव्यांग संघटना’ या पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे आपले सामाजिक कार्य सुरू ठेवतील. ज्या कार्यकर्त्यांना केवळ समाजसेवा करायची आहे, ते संघटनेत राहतील; तर ज्यांना प्रत्यक्ष राजकारणात रस आहे, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सुस्पष्ट पर्याय त्यांनी आपल्या समर्थकांना दिला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या