मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठरविक कालावधीसाठी ट्रस्टवर करण्यात येणारी नियुक्तीची प्रथा संपुष्टात आली आहे.टाटाच्या दोन्ही ट्रस्टच्या संचालक मंडळांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यापुढे ट्रस्टवरील कोणताही सदस्य स्वतः राजीनामा देत नाही तोपर्यंत निवृत्त होणार नाही. नव्या सदस्याची निवड सर्व सदस्यांच्या संमतीनंतरच केली जाणार आहे.यापूर्वी टाटा ट्रस्टवर विश्वस्तांची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जात होती.सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली. या ट्रस्टवर सहा सदस्य आहेत. तर सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना १९१९ मध्ये करण्यात आली. या ट्रस्टवर सात सदस्य आहेत.
