नाशिकातील सिटीलिंक बससेवेचे कर्मचारी शनिवार पासून संपावर

नाशिक- १२ हजार रुपये पगार वाढवण्याच्या मागणीसाठी नाशिकातील सिटीलिंक बससेवेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. हे कर्मचारी शनिवारपासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी सिटीलिंक व्यवस्थापनने हालचाली सुरू केल्या आहेत.नाशकात बेस्टच्या धर्तीवर सिटीलिंक बससेवा सुरू झाली. मात्र, थकीत पीएफ-ईएसआय, थकीत वेतनामुळे अनेक वेळा सिटीलिंकचे चालक-वाहक संपावर गेले. परिणामी सिटीलिंक बससेवेला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. अशात आता पगारात १२ हजार रूपये वाढ करण्याच्या मागणीसाठी सिटीलिंकचे चालक-वाहक शनिवारपासून संपावर जाणार आहेत.