अदानीचा धारावीचा पुनर्विकास परिसरातील जमिनींवरही डोळा

मुंबई- अदानी कंपनी समूहाकडून होऊ घातलेला धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत परिसरातील जमिनींवरही डोळा असल्याचे उघड झाले आहे.
धारावीलगत ओ.एन.जी.सी. कंपनीच्या कामगारांसाठी बांधलेल्या निवासस्थानाच्या इमारत क्रमांक ८ व ९ या प्रत्येकी चार मजली इमारती आहेत. या दोन्ही इमारतींचे भूसंपादन करण्याच्या हालचाली धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि एसआरए या दोन्ही कार्यालयाकडून सुरू झाल्या आहेत. या इमारती पाडून त्याजागी ओएनजीसी कंपनीच्या कामगारांसाठी उंच टॉवर बांधण्यात येणार आहेत. तर उर्वरित जमिनीचा वापर धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. अदानी कंपनीने माटुंगा येथील रेल्वेची जमीन हस्तांतरित केल्यानंतर आता ओएनजीसी कंपनीच्या जमिनीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top