अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील भारतीय वंशाच्या उमेदवाराला धमकी

वॉशिंग्टन

भारतीय वंशाचे अमेरिकन राष्ट्रपती पदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली. सून टायलर अँडरसन (३०) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अँडरसनने दोन संदेश जारी केलेआहेत. यातील पहिल्या संदेशात म्हटले आहे की, उमेदवाराचे डोके उडवण्याची चांगली संधी आहे, तर त्याने आपल्या दुसऱ्या संदेशात म्हटले की, मी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना ठार मारेन.

यानंतर रामास्वामी यांनी या धमकीची पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अँडरसन याला ५ वर्षांचा तुरुंगवास, ३ वर्षांची पर्यवेक्षी सुटका आणि २५०,००० डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. अँडरसनच्या अटकेनंतर रामास्वामी यांनी कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top