अमेरिकेची पहिली खासगी चंद्रमोहीम अयशस्वी ठरली

न्यूयॉर्क
लँडरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेची पहिली खाजगी चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे. खासगी कंपनी ॲस्ट्रोबोटिकने संपूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितले की, हे लंॅडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. त्यामुळे चंद्रावर उतरण्याचा अमेरिकेचा 51 वर्षांनंतरचा प्रयत्न अपयशी ठरला.
इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर अमेरिकेची पहिली खासगी चंद्रमोहिम अयशस्वी झाल्याचे या मोहिमशी संबंधित तज्ञांनी मान्य केले आहे. ॲस्ट्रोबोटिक या लँडरची निर्मिती करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की, फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लॉन्च अलायन्स रॉकेट वल्कनवर लँडरचे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, लॉन्च केल्याच्या 7 तासांनंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडर चंद्रमोहीम अयशस्वी झाली.
रॉकेटमध्ये आता 40 तास पुरेल एवढे इंधन शिल्लक असल्याने ते सॉफ्ट लँडिंग आता शक्य नव्हते. अमेरिकन सरकारनेही या मोहिमला पाठिंबा दिला होता आणि कंपनीला 100 दशलक्ष डॉलर दिले. त्यानंतर ॲस्ट्रोबॉटिक कंपनीने सीईओ म्हणाले की, मोहिम यशस्वी झाल्यास खासगी कंपनीने चंद्रावर पहिले सॉफ्ट लँडिंग असेल. यापूर्वी अमेरिकेने 1972 मघ्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यानंतर अपोलो 17 चंद्रावर उतरले आणि अमेरिकेने ध्वज फडकावला. मात्र, 51 वर्षांनतर अमेरिकेचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top