अमेरिकेतल्या हिम वादळाने जनजीवन ठप्प,वीज गायब

फ्लोरिडा
अमेरिकेच्या पूर्वेकडच्या १२ राज्यांमध्ये हिमवादळ आले असून त्यामुळे इथला भाग गोठला आहे. या हिमवादळामुळे इथल्या अनेक घरांचा वीजपुरवठाही बंद झाला आहे.
अमेरिकेच्या मध्य भागातल्या तापमानात प्रचंड घट झाली असून इथला भाग पूर्णपणे गोठला गेला आहे. या मुळे इथले जनजीवनही ठप्प झाले आहे. या हिमवादळाचा फटका इथल्या ४ लाख १८ हजार घरांना बसला असून इथली दुकानं आणि इतर व्यवहारही बंद पडले आहेत. अशा प्रकारचा हिवाळा या आधी २०२१ मध्ये अमेरिकेच्या मध्य भागात आला होता. २०२२ मध्ये आलेल्या हिमवादळाने तर अमेरिकेतली अनेक उर्जानिर्मिती केंद्रे बंद पडली होती. अर्ध्या देशातली गॅस पाईपलाईनही गोठली होती.
यंदाच्या या हिमवादळाने फ्लोरिडामधल्या १ लाख २ हजार घरांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. जॉर्जिया मध्ये ६२ हजार घरांचा तर नॉर्थ कॅरोलिना इथल्या ४४ हजार घरांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. या हिमवादळामुळे अर्ध्याहून अधिक अमेरिकेवर जणू बर्फाचा थर साठला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top