आचारसंहितेचा भंग! चंद्रहार पाटलांवर गुन्हा

सांगली – महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली होती. मात्र, ही प्रचार पदयात्रा काढण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पाटील यांच्यासह ३ समर्थक कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर चंद्रहार पाटील यांच्यावर कारवाई झाल्याने ठाकरे गटाला धक्का बसू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top