इराकमध्ये महिला टिकटॉक स्टारची गोळ्या झाडून हत्या

बगदाद- इराकमधील टिकटॉक स्टार ओम फहाद हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. परवा रात्री बगदादच्या पूर्वेकडील जोयोना जिल्ह्यातील तिच्या घराजवळ बाहेरच मोटरसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

ओम फहाद आपल्या एसयूव्ही कारमधून घरी परतली होती, त्यावेळी हल्लेखोरांनी अगदी जवळून तिच्यावर गोळीबार केल्याचे जवळच्या सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झाले आहे.ओम फहाद हिचे खरे नाव गौफरान सवादी असे होते. टिकटॉक ऍपवर ती पॉप गाण्यावर बनवलेले व्हिडीओ अपलोड करत असे. तिच्या व्हिडीओंना जवळपास ५ लाख फॉलोअर होते. तिच्या काही व्हिडीओंना तर १० लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितल्याची नोंद होती. मात्र इराकी न्यायालयाने तिच्या व्हिडीओंमध्ये असलेली अयोग्य भाषा सार्वजनिक नैतिकतेचे अवमूल्यन करणारी असल्याचे ठरवून तिला २०२३ मध्ये ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. तसेच तिच्यासारख्या अन्य ५ टिकटॉकवरदेखील २ वर्षांपर्यंतच्या कालावधीची शिक्षा सुनावली होती. तर इतरांविरोधात तपास सुरू केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top