इराणमध्ये हिजाब न घातल्याने महिलेला चाबकाचे ७४ फटके

तेहरान

इराणमध्ये हिजाब न घातल्याने २ महिलांना शिक्षा सुनावण्यात आली. एका महिलेला चाबकाचे ७४ फटके मारले तर दुसऱ्या महिलेला २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रोया हेशमती (३३) आणि जेनब अशी शिक्षा सुनावलेल्या महिलांची नावे आहेत. इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न केल्यास त्या महिलांना कडक शिक्षा सुनावली जाते.

रोया हेशमती हिने नेहमीच हिजाबला विरोध केला. रोया हिने हिजाबवर जोरदार टीका केली होती. यामुळे तिला चाबकाचे ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील न्यायालयाने रोयाला ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. याशिवाय रोयावर सुमारे २४ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. याबाबत स्वत: रोयाने तिचा अनुभव सांगितला की, शिक्षेसाठी ती तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोचहोली. तेथे प्रवेश केल्यानंतर तिने हिजाब उतरविला. ते पाहून तेथील अधिकारी चिडले आणि तिला पुन्हा हिजाब परिधान करण्यास सांगितले. परंतु याच कारणांमुळे आम्ही इथे आलो आहोत, मला चाबकाचे फटके मारा, अशा शब्दांत तिने प्रत्युत्तर दिले. त्यांनी अत्यंत निर्दयतेने चाबकाचे फटके मारले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top