इस्रायल दूतावास स्फोट! विशेष पथकाकडे तपास

नवी दिल्ली – इस्रायलच्या दूतावासाजवळ गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता हे विशेष तपास पथक करणार आहे.

नवी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ एक सौम्य स्फोट झाला होता. या स्फोटात सीसीटीव्ही फुटेजसह इतरही अनेक गोष्टींचा तपास करण्यात येत आहे. राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी तुघलक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनीही केंद्रिय तपास पथकाने केलेल्या तपासाच्या नोंदी या विशेष पथकाकडे दिल्या आहेत. आता यापुढील तपास हे विशेष तपास पथक करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top